मडगाव : गोव्यातील जनतेचे जनमत भाजपच्या विरोधात गेलेले असतानाच या संधीचा फायदा नगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून मिळविण्यात काँग्रेस पूर्णत: अपयशी ठरली आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेस कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा सक्रिय करण्याची संधी पक्षाकडे असतानाही ही निवडणूक काँग्रेस पक्षाने लढवू नये, असा ठराव प्रदेश कार्यकारिणीने घेऊन कार्यकर्त्यांना अक्षरश: वाऱ्यावर सोडले आहे. मडगावसह एकाही पालिकेत काँग्रेसने पूर्ण क्षमतेने आपले पॅनल उभे केलेले नाही. याउलट भाजपने नियोजनबद्धपणे नगरपालिका आपल्या ताब्यात याव्यात यासाठी प्रयत्न चालू ठेवले आहेत. (पान ७ वर)
पालिका निवडणुकीबाबत काँग्रेसमध्ये अनास्था
By admin | Updated: October 11, 2015 01:31 IST