शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पर्रीकर सरकार पाडण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील - सुदीन ढवळीकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 18:28 IST

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सरकार स्थिर आहे. ते अस्थिर करण्यासाठी काँंग्रेस नेते  प्रयत्न करीत आहेत. असा गौप्यस्फोट  मगोचे नेते व  सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदीन ढवळीकर यांनी येथे गुरुवारी केला.

मडगाव - मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सरकार स्थिर आहे. ते अस्थिर करण्यासाठी काँंग्रेस नेते  प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी ते सतत आपल्याशी संपर्क करत आहेत. एवढेच नव्हे तर गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांच्याकडेही जाऊन या कॉंग्रेस नेत्यांनी प्रयत्न केले होते, असा गौप्यस्फोट  मगोचे नेते व  सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदीन ढवळीकर यांनी येथे गुरुवारी केला.

    तुमच्या संपर्कात नेमका कोणता कॉंग्रेस नेता होता?  माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत की कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर असे त्यांना विचारले असता ते म्हणाले, मी कोणाचे नाव घेत नाही. मात्र हे सरकार पाडावे यासाठी कॉंग्रेसचे प्रयत्न चालू आहेत एवढे नक्की.पर्रीकर सरकार पूर्ण पाच वर्षे हे सरकार टिकून राहील. आमच्या कोणाकडूनही या सरकारला धोका नाही, असे ते म्हणाले.   पर्रीकर काही काळासाठी  विदेशात गेले होते. अन्य दोन मंत्री प्रकृतीच्या कारणावरून प्रशासनात भाग घेऊ शकत नसले तरी  या सरकारात पाच सहा ज्येष्ठ मंत्री आहेत, जे इतर मंत्र्यांची कामेही स्वत: करू शकतात. आमचे मंत्रिमंडळ कार्यक्षम आहे आणि  मुख्य सचिवही  प्रशासन योग्य प्रकारे हाताळण्या इतपत  कार्यक्षम असल्याचे ते म्हणाले. माझ्यामुळेच स्थिरता : विजय सरदेसाई आमच्या गोवा फॉरवर्ड पक्षाने मनोहर र्पीकर यांच्या सरकारला संपूर्ण पाठिंबा दिल्यामुळेच  सरकार स्थिर आहे.  या सरकारला माझ्यामुळेच स्थिरता आली आहे. त्यामुळेच मी विरोधकांच्या टिकेचे लक्ष्य बनलो आहे. त्यामुळेच कॉंग्रेससारखे विरोधक माङयावर टीका करताहेत,अशी प्रतिक्रिया गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी केली आहे.  मडगावातील  एका ‘अभिरुप न्यायालय ’ कार्यक्रमात  आरोपीच्या पिंज-यात उभे केलेल्या नगरनियोजन मंत्र्यांनी ही  प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांच्यामुळेच  सरकारे अस्थिर होतात असा त्यांच्यावर आरोप  होता. त्या आरोपाला उत्तर देताना सरदेसाई म्हणाले, खरे तर  आमच्या पाठिंब्यामुळेच सरकारला स्थिरता आली आहे. पर्रीकर यांना पाच वर्षांसाठी पाठिंबा देणार असे वचन मी त्यांना दिले होते. ते वचन मी पाळणार आणि खरा गोंयकार  म्हणून सिध्द करणार.

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर