शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

विश्वजित राणेंच्या अपात्रतेसाठी काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 20:34 IST

पर्रिकर सरकारमध्ये आरोग्य मंत्री असलेले विश्वजित राणो यांना अपात्र ठरविले जावे म्हणून काँग्रेस पक्षाने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राणो यांच्याविरुद्धच्या याचिकेवर सभापतींनीच अगोदर निवाडा देऊ द्या, अशी भूमिका घेऊन काँग्रेसची याचिका

पणजी -  पर्रिकर सरकारमध्ये आरोग्य मंत्री असलेले विश्वजित राणो यांना अपात्र ठरविले जावे म्हणून काँग्रेस पक्षाने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राणो यांच्याविरुद्धच्या याचिकेवर सभापतींनीच अगोदर निवाडा देऊ द्या, अशी भूमिका घेऊन काँग्रेसची याचिका निकालात काढल्यानंतर आता हायकोर्टाच्या या निवाडय़ाला काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

विश्वजित राणे यांनी 2017 सालच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आल्यानंतर व आमदारकीची शपथ घेतल्यानंतर लगेच आमदारकीचा राजीनामा दिला होता. मात्र राजीनामा देण्यापूर्वी काही तास अगोदर ते गेल्या मार्चमध्ये विधानसभेत र्पीकर सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावेळी सभागृहात अचानक अनुपस्थित राहिले होते. आमदारकी सोडून ते भाजपमध्ये गेले व भाजपच्या तिकीटावर पोटनिवडणुकीत जिंकून आले. तथापि, विश्वजित यांची कृती ही अपात्रतेला निमंत्रण देणारी ठरती असा दावा काँग्रेसने करून उच्च न्यायालयात याचिका सादर केली होती. गेल्या ऑक्टोबरमध्ये न्यायालयाने आपण या याचिकेवर निर्णय देऊ शकत नाही, अगोदर सभापतींकडे निर्णय होऊ द्या, असे स्पष्ट केले होते. सभापती डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडेही विश्वजितविरुद्धची अपात्रता याचिका आहे पण ती सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांनी सादर केली आहे. गावकर यांनी याचिका सादर करण्यामागिल हेतू वेगळा असल्याचे काँग्रेसचे म्हणणो आहे.

2022 सालार्पयत म्हणजे पुढील पाच वर्षासाठी राणो यांना अपात्र ठरविले जावे, अशी काँग्रेसची उच्च न्यायालयासमोर याचिका होती. तथापि, ती याचिका निकालात काढताना न्यायालयाने तक्रारदाराने अगोदर सभापतींकडे जावे व सभापतींच्या निर्णयाची छाननी करण्यासाठी मग न्यायालयाकडे जाता येईल असे म्हटले होते. काँग्रेसने उच्च न्यायालयाच्या या निवाडय़ाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. राणो यांनी काँग्रेसमध्ये असताना काँग्रेसचा व्हीप पाळला नाही व त्यामुळे घटनेच्या 191 कलमाखाली ते पाच वर्षासाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरतात व मंत्री म्हणूनही अपात्र ठरतात, असे काँग्रेसचे म्हणणो आहे. तसेच सभापतींच्या कक्षेत विश्वजित राणो यांचा विषयच येत नाही, अशीही काँग्रेसची भूमिका आहे. सर्वोच्च न्यायालयात काँग्रेसने याचिका सादर केल्याच्या वृत्ताला काँग्रेसचे गोवा प्रभारी डॉ. चेल्लाकुमार यांनी गुरुवारी लोकमतशी बोलताना दुजोरा दिला.

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस