शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अमित शहा यांना मिनरल वॉटरच्या बाटल्या देण्याची काँग्रेसची तयारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 19:27 IST

गोवा दौ-यावर येणार असलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मिनरल वॉटरच्या बाटल्या देण्याची तयारी चालवली आहे. 

पणजी : तिसवाडी आणि फोंडा तालुक्यात गेले सात दिवस लोकांना पाणी न मिळाल्याने सरकारचा निषेध करण्यासाठी प्रदेश काँग्रेसने आज गोवा दौ-यावर येणार असलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मिनरल वॉटरच्या बाटल्या देण्याची तयारी चालवली आहे. 

शहा हे पश्चिम विभागीय मंडळाच्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी गोव्यात येत आहेत. या बैठकीला गोव्यासह गुजरात, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच दमण दीव आणि दादरा नगरहवेलीचे प्रशासक उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी उपहासात्मकपणे, असे ट्विट केले आहे की. ‘ गेले हात दिवस राजधानी शहरातील नळ कोरडे पडले आहेत. अमित शहा ज्या हॉटेलमध्ये उतरतील तेथेही नळ कोरडे असतील, तेव्हा त्यांना मिनरल वॉटरच्या बाटल्या देण्याची आमची तयारी आहे.’ शुक्रवार १५ पासून राजधानी शहरासह तिसवाडी तालुका तसेच फोंडा तालुक्याला पाणी पुरवठा झालेला नाही. सरकारचे हे अपयश असल्याची टीका चोडणकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना केली व या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला.