शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
3
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
4
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
5
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
11
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
12
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
13
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
14
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
15
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
16
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
17
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
18
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी

तिसऱ्या मांडवी पुलावर वीजदिवे बसविण्याचे ३0 कोटींचे काम निविदा न काढताच : काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 20:55 IST

मांडवी नदीवरील तिस-या पुलाची मेसर्स एस. एन. भोबे ही कन्सल्टंट कंपनी गुजरात व बिहार सरकारच्या काळ्या यादीत असूनही याच कंपनीला काम देण्यात आले.

पणजी : मांडवी नदीवरील तिस-या पुलाची मेसर्स एस. एन. भोबे ही कन्सल्टंट कंपनी गुजरात व बिहार सरकारच्या काळ्या यादीत असूनही याच कंपनीला काम देण्यात आले. सुरतमध्ये बांधकाम चालू असताना पूल कोसळून १0 जण ठार झाले तर पाटणा येथे याच कंपनीने डिझाइन केलेले पुलाचे डिझाइन सदोष निघाले त्यामुळे मांडवी पुलाचे काम काळजीपूर्वक तपासावे आणि तो पूर्ण सुरक्षित असल्याची खातरजमा केल्याशिवाय खुला करु नये अशी मागणी प्रदेश काँग्रेसने केली आहे.या पुलावर विजेचे दिवे बसविण्यासाठीचे ३0 कोटींचे काम निविदा न काढताच दिलेले असल्याचा आरोप करुन यात गफला असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले की,ह्यसनदशीर मार्गाने निविदा न काढताच ३0 कोटींचे काम देण्यात आल्याने दक्षता खात्यातर्फे चौकशी होण्याची गरज आहे. एस. एन. भोबे कंपनीने सुरत येथे ज्या पुलासाठी कन्सल्टंट म्हणून काम केले तो पूल २0१४ साली बांधकाम चालू असतानाच कोसळला. महालेखापालांनीही कडक निरीक्षण नोंदविल्याने गुजरात सरकारने या कंपनीला काळ्या यादीत टाकलेले आहे. पाटणाजवळ १७0 कोटी रुपये खर्चाच्या पुलाचे चुकीचे डिझाइन या कंपनीने केले त्यामुळे खर्च वाढला त्यामुळे बिहार सरकारनेही या कंपनीला काळ्या यादीत टाकलेले आहे.माडंवीवरील तिसºया पुलाचे आयुष्य शंभर वर्षे असणार असे सांगितले जाते. तेव्हा काम योग्यरित्या व्हायला हवे. ह्यलोड टेस्टिंगह्ण व्हायला हवे. पुलाच्या दक्षिणेकडील जोडरस्ते पूर्ण झालेले नाहीत. उतरण्यासाठी व्यवस्था झालेली नाही, असे असताना उद्घाटनाची घाई का? असा सवाल त्यांनी केला. या पुलाचा सुरवातीचा खर्च ३५५ कोटी रुपये दाखवण्यात आला होता. परंतु आता तो प्रचंड वाढलेला असून खर्चाबाबतही लपवाछपवी केली जात असल्याचा आरोप चोडणकर यांनी केला. नदीपात्रात प्रत्यक्ष पूल केवळ ६00 मिटर अंतरात असताना ५ किलोमिटरचा आणि सर्वात लांबीचा तिसरा पूल अशी बतावणी केली जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली. या पुलावर प्रचंड खर्च करण्यात आला असून केंद्राकडून निधी मिळत असताना राज्य सरकारने घाई केली आणि आता कर्ज काढून वर्षाकाठी ४८ कोटी रुपये व्याज भरीत आहे. जीएसआयडीसी घाऊक भ्रष्टाचाराचे आगार बनले असल्याचा आरोप त्यांनी केला.दरम्यान, ह्यसेझह्ण प्रवर्तकांना त्यांनी गुंतविलेल्या मूळ रकमेवर १२३ कोटी २९ लाख रुपये व्याज देण्याची जी तयारी सरकारने दाखवली आहे त्यास काँग्रेसने विरोध केला आहे. चोडणकर म्हणाले की, सरकार २५६ कोटी रुपये प्रवर्तकांना परत करणार आहे. परंतु मूळ रक्कमदेखिल परत करण्याची तरतूद नाही. जनतेच्या करातून मिळणाºया पैशांची उधळपट्टी चालली आहे. प्रवर्तकांना पैसे परत करण्याच्या प्रकरणात मोठा घोटाळा आहे.नुवें येथे डान्स पार्टी प्रकरणी ग्रामसभेने घेतलेल्या ठरावाचा हवाल पोलिस उपाधिक्षकाने दिला आहे. प्रत्यक्षात असा ठराव झालेलाच नाही. त्यामुळे या उपाधीक्षकावर कारवाई केली जावी, अशी मागणी चोडणकर यांनी केली. पत्रकार परिषदेस प्रवक्त्या स्वाती केरकर, खेमलो सावंत आदी उपस्थित होते.