शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

गोव्याच्या रणजी टीममध्ये अझरुद्दीनपुत्रासह दोघा परप्रांतीयाच्या समावेशाने काँग्रेस संतप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 20:53 IST

गोव्याच्या रणजी क्रिकेट टीममध्ये शदाब जकाती, स्वप्निल अस्नोडकर यासारख्या उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या खेळाडूंना डावलून दोघा परप्रांतीय खेळाडूंचा समावेश केल्याबद्दल गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सुरज लोटलीकर यांचा निषेध करीत काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

 पणजी - गोव्याच्या रणजी क्रिकेट टीममध्ये शदाब जकाती, स्वप्निल अस्नोडकर यासारख्या उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या खेळाडूंना डावलून दोघा परप्रांतीय खेळाडूंचा समावेश केल्याबद्दल गोवाक्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सुरज लोटलीकर यांचा निषेध करीत काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

पक्षाचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी पत्रकार परिषदेत ही मागणी केली. सुरज लोटलीकर हे गोवा फॉरवर्ड पक्षाचे खजिनदारही आहेत. गोवा क्रिकेट असोसिएशनमध्ये त्यांनी राजकारण आणले आहे आणि दलाली चालू केली आहे, असा गंभीर आरोपही पणजीकर यांनी केला. रणजी टीममध्ये समावेश केलेल्या असादुद्दिन मोहम्मद आणि अमित वर्मा या दोन्ही परप्रांतीय खेळाडूंची कामगिरी सुमार आहे त्यांनी कोणतीच चमक दाखवलेली नसताना त्यांना संघात का स्थान दिले, असा प्रश्न पणजीकर यांनी केला. 

असादुद्दिन हा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अझरुद्दिन याचा पुत्र होय. गोव्यात एकापेक्षा एक उत्कृष्ट खेळाडू असताना हैदराबादहून खेळाडू आयात करण्याची गरज अध्यक्षांना का भासली. गोंय, गोंयकार, गोंयकारपण हे गोवा फॉरवर्ड पक्षाचे ब्रिद लोटलीकर विसरले काय, असा खोचक सवाल पणजीकर यांनी केला. ते पुढे म्हणाले की, २0१७ च्या विधानसभा निवडणुकीत शदाब जकाती हा गोवा फॉरवर्डचा स्टार प्रचारक होता. कोणत्याही व्यक्तीला वापरुन फेकून देण्याचीच गोवा फॉरवर्डची वृत्ती आहे काय, असा प्रश्नही त्यांनी केला. 

शदाब जकाती याने या अन्यायाविरुध्द तोंड उघडले म्हणून त्याला त्याचे क्रिकेट करियर संपवू तसेच रणजी टीममध्ये आणि आयपीएलमध्ये कधीच समावेश होणार नाही हे पाहू अशा धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही पणजीकर यांनी केला. ते म्हणाले की, घेतलेले नवीन खेळाडू जर चांगल्या दजाचे असते तर आमची हरकत नव्हती परंतु त्यांची आजवरची कामगिरी अगदीच खराब आहे. जीसीएमध्ये दलाली आणि फिक्सिंग चालले आहे, असा आरोप त्यांनी केला. 

पत्रकार परिषदेस पणजी गटाध्यक्ष प्रसाद आमोणकर तसेच एनएसयुआयचे पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :Cricketक्रिकेटgoaगोवा