शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

तिंरगा फडकविण्यासाठी काँग्रेसचे राज्यपालांना साकडे, सभापतींना आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 22:26 IST

भारतीय स्वातंत्र्यदिनी येत्या 15 रोजी पणजीतील जुन्या सचिवालयासमोर होणा-या सोहळ्य़ावेळी राज्यपालांनी स्वत: तिरंगा ध्वज फडकवावा, अशी मागणी काँग्रेसने शनिवारी राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.

पणजी : भारतीय स्वातंत्र्यदिनी येत्या 15 रोजी पणजीतील जुन्या सचिवालयासमोर होणा-या सोहळ्य़ावेळी राज्यपालांनी स्वत: तिरंगा ध्वज फडकवावा, अशी मागणी काँग्रेसने शनिवारी राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अत्यंत महत्त्वाच्या सोहळ्य़ाला अनुपस्थित राहिले तरी, त्यांच्या अनुपस्थितीत सभापतींकडे तिरंगा फडकविण्याची जबाबदारी सोपवून पर्रीकर यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचे म्हणणे आहे.

मुख्यमंत्री पर्रीकर हे आजारी असल्याने उपचारांसाठी अमेरिकेला गेले आहेत. भारतीय स्वातंत्र्य दिन हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे, त्या दिवशी होणा-या राष्ट्रीय सोहळ्य़ावेळी मुख्यमंत्र्यांनी गोव्यात उपस्थित असू नये ही दुर्दैवी गोष्ट आहे, असे चोडणकर यांनी म्हटले आहे.  भारतीय स्वातंत्र्यदिन नजरेसमोर ठेवून पर्रीकर यांना त्यांच्या अमेरिका भेटीविषयी योग्य पद्धतीने नियोजन करता आले असते. तथापि, ते गोव्याबाहेर गेलेले असले तरी, त्यांनी सभापतींकडे तिरंगा फडकविण्याचे काम सोपवून चुकीची कृती केली आहे, सरकारचा पक्षपातीपणा यावरून दिसून येतो, असे चोडणकर यांचे म्हणणे आहे.

सभापती हे निपक्षपाती असतात. सभापती ही एक स्वतंत्र संस्था असते व त्यांना सरकारच्या कामकाजाशी काही देणोघेणो नसते. सरकारमधील एखादा ज्येष्ठ मंत्री किंवा अन्य कोणत्याही मंत्र्याकडे मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकविण्याची जबाबदारी द्यायला हवी होती. र्पीकर यांनी तसे केले नाही याची दखल राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांनी घ्यावी व राज्यपालांनी स्वत: तिरंगा फडवून शान राखावी, अशी मागणी चोडणकर यांनी केली आहे.

देशात कुठेच कधी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत भारतीय स्वातंत्र्यदिनी मुख्य शासकीय सोहळ्य़ावेळी सभापतींनी तिरंगा फडकविल्याचे उदाहरण नाही असे चोडणकर यांचे म्हणणे आहे. विद्यमान सरकारमध्ये काही ज्येष्ठ मंत्री आहेत, तरी देखील मंत्र्यांकडे तिरंगा फडकविण्याचा मान न सोपविता पर्रीकर यांनी सभापतींकडे तो सोपवला असे चोडणकर यांनी राज्यपालांना पाठवलेल्या निवेदनातही नमूद केले आहे.

मंत्र्यांमध्येही चर्चा 

दरम्यान, विरोधी काँग्रेसने हा विषय लावून धरल्यानंतर त्यावरून मंत्र्यांमध्येही चलबिचल सुरू झाली आहे. राष्ट्रीय महत्त्वाच्या दिनी पणजीतील मुख्य सोहळ्य़ावेळी आमच्याकडे मुख्यमंत्र्यांनी तिरंगा फडकविण्याचे काम का सोपविले नाही असा प्रश्न काही मंत्र्यांनाही पडला आहे. काही मंत्री तालुकास्तरावर होणा-या कार्यक्रमावेळी ङोंडा फडकवतील. मंत्री फ्रान्सिस डिसोझा हे यावेळी म्हापशात तिरंगा फडकवणार नाहीत, कारण ते आजारी आहेत. तिथे महसुल मंत्री रोहन खंवटे हे ध्वज फडकावतील. आरोग्य मंत्री विश्वजित राणो हे वाळपईत तिरंगा फडकविणार नाहीत. त्यामागिल नेमके कारण कळाले नाही. वाळपईच्या मामलेदारांच्या हस्ते तिरंगा फडकविला जाईल. 

टॅग्स :goaगोवा