शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पणजी महापालिकेत महापौर-आयुक्त संघर्ष शिगेला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 13:03 IST

कचरा उचलण्यावरुन निर्माण झालेला वाद टोकाला

पणजी : राजधानी शहरात स्मार्ट सिटीच्या कामावरुन महापौर उदय मडकईकर आणि आयुक्त शशांक त्रिपाठी यांच्यात सुरु झालेला संघर्ष शिगेला पोहोचला आहे. आयुक्तांनी पणजीतील ४४ इमारती, २६ हॉटेल्सना महापालिका कचरा उचलणे बंद करण्यासंबंधी नोटिसा बजावल्यानंतर या इमारतींना खाजगी क्षेत्राच्या सहकार्याने कंपोस्टिंग युनिट बांधून देण्याची तयारी महापौरांनी दाखवली. दुसरीकडे कचरा उचलण्यासाठी शेजारी ताळगांव पंचायतीची मदत घेण्याचे त्यांनी जाहीर केले. कचरा बंद करु देणार नाही, असा इशारा देत गरज पडल्यास या लोकांना सीएसआरखाली आर्थिक मदत मिळवून कंपोस्टिंग युनिटस उपलब्ध करु, असे महापौरांनी सांगितले. मडकईकर म्हणाले की, ‘स्मार्ट सिटीचे प्रत्येक काम महापालिकेला विश्वासात न घेताच केलेले आहे. वरील इमारती तसेच हॉटेलांचा कचरा उचलणे बंद करण्याचा निर्णय आयुक्तांनी राजकीय दबावाखालीच घेतलेला आहे. १५ दिवसात स्वत:च्या कंपोस्टिंग युनिटची सोय करण्यास या हॉटेलमालकांना बजावले आहे. महापालिका कचरा कर गोळा करते त्यामुळे कचरा उचलणे बंद करुन चालणार नाही. मी कोणालाही वाºयावर सोडणार नाही. गरज पडल्यास बड्या कंपन्यांकडून पुरस्कृत मिळवून या इमारतींना कंपोस्टिंग युनिट उपलब्ध करुन देईन. नव्या इमारतींना कचºयाची विल्हेवाट स्वत: करण्याची अट बांधकामाआधीच घातली जाते. काही इमारतींनी ही व्यवस्था केलेली नाही. कचरा उचलणे बंद करायचे असेल तर आधी क र वसुली बंद करावी लागेल. महापालिकेने बैठकीत तो निर्णय घ्यावा लागेल. आयुक्तांनी याबाबतीत मनमानी करु नये, असे ते म्हणाले. दरम्यान, पावसाळ्यात पणजी बुडाल्यास मी जबाबदार नाही, असेही महापौर मडकर यांनी म्हटले असून खापर आयुक्तांवर खापर फोडले आहे. मडकईकर म्हणाले की, ‘स्मार्ट सिटीच्या कामांना आमचा विरोध नाही. नेमके कोणकोणत्या ठिकाणी खोदकाम करणार याचा प्लॅन आम्ही मागितला होता. तो स्मार्ट सिटीवाले सादर करु शकले नाहीत. ३0 एप्रिलपर्यंत खोदकामे बंद करणे अपेक्षित होते. मात्र शहरात ठिकठिकाणी खोदकामे केलेली आहेत. रायबंदर-पणजी भूमिगत वीज वाहिन्यांसाठी मान्सून तोंडावर असताना खोदकाम केलेले आहे. कांपाल येथे पदपथ फोडले तेव्हा आम्ही बंद केलेले काम आयुक्तांनी पुन्हा चालू करण्यास वाट मोकळी करुन दिली.

बायंगिणी कचरा प्रकल्प का रखडला?; महापौरांचा संतप्त सवाल दरम्यान, सरकारने ६ महिन्यात कचरा प्रक्रिया प्रकल्प बांधून देतो असे सांगून अडीच वर्षांपूर्वी महापालिकेची बायंगिणीतील जागा आपल्या ताब्यात घेतली परंतु अजून हा प्रक ल्प झालेला नाही. तो झाला असता तर पणजीतील कचºयाची समस्या कायमची मिटली असती. सरकारने महापालिकेवर त्यावेळी दबाव आणून ही जमीन ताब्यात घेतली. परंतु काहीच केले नाही. प्रकल्पासाठी आलेला पैसाही इतर कामांसाठी वळविला. शहरातील कचरा समस्येला खरे तर सरकारच जबाबदार आहे, असा आरोप महापौर मडकईकर यांनी केला.  

टॅग्स :Mayorमहापौर