शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कला अकादमीची स्थिती दिवसेंदिवस होतेय दयनीय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 13:45 IST

कला राखण मांडची सांबाखावर धडक : संरचनात्मक ऑडिटची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : कला अकादमीची स्थिती दिवसेंदिवस दयनीय होत चालली आहे. यावर कुणाचेही नियंत्रण राहिलेले नाही, असा प्रश्न उपस्थित करत काल, शुक्रवारी कला राखण मांड संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी मुख्य अभियंता उत्तर पार्सेकर यांची भेट घेऊन अकादमीच्या स्थितीवरुन त्यांना घेरले. यावेळी अकादमीच्या कामाचे संरचनात्मक ऑडिट करण्याची मागणी केल्याची माहिती कला राखण मांडचे प्रमुख देविदास आमोणकर यांनी दिली.

यावेळी त्यांच्यासोबत टास्क फोर्सचे फ्रान्सिस कुएल्हो, कलाकार राजदीप नाईक, सीसील रॉड्रिग्ज व इतर मान्यवर उपस्थित होते. कला अकादमीच्या छताला गळती लागली आहे. ब्लॅक बॉक्स नीट वापरात नाही, आर्ट गॅलरीमध्ये योग्य प्रकाश योजना नाही, वातानुकुलीत यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे.

संगीत वर्ग साऊंड प्रुफ हवे होते ते साऊंड प्रुफ नाहीत. यातून कलाकारांना व प्रेक्षकांना खूप त्रास सहन करावा लागतो. जेव्हा या गोष्टी पार्सेकर यांच्यापुढे मांडल्या तर त्यांना याबाबतचे काहीच माहिती नसल्याचे समजले. खुल्या रंगमंचबाबत उपाययोजना सुरू असल्याचे पार्सेकर म्हणले.

वेळकाढू धोरण

टास्क फोर्स तयार केल्यापासून आम्ही कला अकादमीचे संरचनात्मक ऑडिट करण्याची मागणी करत आहोत. पण जेव्हा खात्याला याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्ही आयआयटी मद्रास यांना ऑडिट करण्यासाठी निमंत्रित केले आहे, पण त्यांचा प्रतिसाद मिळालेला नाही. जेव्हा याबाबतचे मेल मागितल्यास लक्षात आले मार्चमध्ये आयआयटी मद्रासला कळविण्यात आले आहे. आम्ही आता हा पाठपुरवठा करणार आहोत, जेणेकरून ही समस्या लवकर सुटू शकेल, असे कुएल्हो यांनी सांगितले.

 

टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकार