शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

कॅसिनोप्रश्नी दिल्लीपर्यंत तक्रारी, सरकारची गोची

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 09:49 IST

पेडण्यात ओलित क्षेत्राची जमीन दिली कॅसिनो कंपनीला; विरोधी पक्षांकडून सरकारी यंत्रणेवर जोरदार टीका, धारगळमध्ये साकारणार टाउनशीप

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: पेडणे तालुक्यात तिळारी जलसिंचन प्रकल्पांतर्गत अधिसूचित ओलित क्षेत्रातील लाखो चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन काढून सरकारने एका कॅसिनो कंपनीला कॅसिनो तथा टाऊनशीप सीटीसाठी दिल्याने लोकांमध्ये संतापाचे वातावरण तयार झाले आहे. याबाबत काहीजणांनी दिल्लीपर्यंत तक्रारी पोहचविल्या आहेत. या विषयावरून सरकारची गोची होऊ शकते, कारण सर्वच विरोधक या विषयावरून संघटित होऊ लागले आहेत.

सरकारने यापूर्वी लोकांचा विरोध असतानाही पेडण्यात सनबर्न फेस्टिव्हल केले. जी संस्कृती पेडणेत किंवा धारगळ परिसरात कधीच नव्हती ती संस्कृती व विकृती अट्टहासाने सरकार लादू पाहत आहे, याची कल्पना अनेक एनजीओंनाही आली आहे. ग्रामस्थांविरुद्ध पोलिस बळाचा वापर करून काही महिन्यांपूर्वी पेडण्यात सनबर्न फेस्टिव्हल केले गेले. आता पेडणे मतदारसंघातच जलसिंचन क्षेत्राची किंवा ओलित क्षेत्रातील तीन लाख चौरस मीटर जमीन काढून एका कॅसिनो कंपनीला दिली गेली आहे. याबाबतही विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारी पातळीवरून होऊ लागला आहे.

विरोधी आमदार युरी आलेमाव, कार्ल्स फेरेरा आदींनी या विषयावरून सरकारवर टीका केली आहेच, काही एनजीओ याबाबत लवकरच आंदोलन करू शकतात, अशी माहिती मिळाली. पेडणे तालुक्यात यापूर्वी आलेल्या प्रकल्पांमध्ये स्थानिकांना रोजगार संधी मिळालीच नाही. कॅसिनो टाऊनशीपमध्ये पेडणेकारांना नोकन्या मिळतील, असे गाजर दाखविण्याचा प्रयत्न होत आहे. कॅसिनो लॉबीसमोर सरकारी यंत्रणा झुकत आहे, याची जाणीव झाल्याने काहीजणांनी दिल्लीपर्यंत तक्रारी पोहचविल्या आहेत.

मांडवीत लवकरच मोठा कॅसिनो येणार

दरम्यान, पणजीतील मांडवी नदीतही एक फार मोठा कॅसिनो लवकरच येणार आहे. काँग्रेसने कॅसिनो गोव्यात आणले असे पूर्वी दावा करणारे सध्याचे काही राजकीय नेते गोव्यात सगळीकडेच कॅसिनोंचे जाळे पसरवू लागले असल्याने संताप व्यक्त होत आहे. पणजीत कॅसिनोंसाठीच जेटी व अन्य साधनसुविधा तयार केल्या जातात. मांडवी नदीत सात मजली कॅसिनो जहाज उभे होईल. ते ११२ मीटर लांब असेल, अशी माहिती भाजपमधीलही एका गटात अस्वस्थता निर्माण करू लागली आहे 

टॅग्स :goaगोवा