शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात किनाऱ्यांवरील कचरा, दलालांकडून होणारी सतावणूक याबाबत आता ॲपवर करा तक्रार

By किशोर कुबल | Updated: January 25, 2024 20:30 IST

बीच व्हिजिल अॅप : वेगवेगळ्या १६ उल्लंघनांच्या प्रकरणांमध्ये नोंदवता येणार तक्रार

किशोर कुबल

पणजी : किनाय्रांवरील कचरा, दलालांकडून होणारी सतावणूक, बेकायदा बांधकामे आदी १६ वेगवेगळ्या गैरप्रकारांबद्दल आता थेट ॲपवर तक्रार करता येईल. या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन कारवाई केली जाईल. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी काल ॲपचे उद्घाटन केल्यानंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गेल्या वर्षी जूनमध्ये लॉन्च करण्यात आलेले बीच व्हिजिल अॅप आत्तापर्यंत आंतरविभागीय वापरासाठीच मर्यादित होते. हे ॲप आता जनतेसाठी खुले केले आहे.

चाचणीच्या टप्प्यात अॅपवर १२४० उल्लंघन नोंदवली गेली व १०९१ समस्यांचे निराकरण करण्यात आले आहे, अशी माहिती पर्यटनमंत्र्यांनी अॅप लॉन्च करताना दिली. ते म्हणाले बहुसंख्य तक्रारी दलालांच्या बाबतीत आणि कचऱ्याशी संबंधित होत्या.किनाय्रांवर स्थानिक लोक तसेच पर्यटकांच्या सुरक्षेसाठी हे ॲप मदत करील. तक्रारींच्या बाबतीत वेळेत कारवाई सुनिश्चित करण्यासाठी विशेष व्यवस्था आह. निर्धारित कालावधीत उल्लंघनांचे निवारण न झाल्यास आपोआप पुढील स्तरावर अधिकाऱ्यांना सूचना जाईल. हेल्पलाइन १३६४ द्वारे देखील उल्लंघनाची तक्रार केली जाऊ शकते.

कचरा, मद्यपानाची घटना असो, डेक बेडचा अनधिकृत विस्तार, किनाऱ्यावर वस्तू किंवा खाद्यपदार्थ विकणारे उपद्रवकारक फेरीवाले अशा कोणत्याही उल्लंघनाचा फोटो काढून अॅप टाकून लोक तक्रार करू शकतात. कायद्यातील अलीकडील सुधारणांमुळे पोलिसांना भादंसंच्या कलम १८८ अन्वये कारवाई करण्याचे अधिकार मिळाले आहेत. पर्यटन विभागाच्या वतीने दलालांना पोलिस थेट अटक करू शकतात, पोलिसांकडून ऑनलाइन दंड वसूल करण्याची यंत्रणाही लवकरच कार्यान्वित केली जाईल, असं खंवटे यांनी सांगितले. बीच क्लिनिंग एजन्सी नेमण्यासाठी  याच महिन्यात नवीन निविदा काढणार

किनाऱ्यांच्या साफसफाई व व्यवस्थापनासाठी बीच क्लिनिंग एजन्सी नेमण्याकरित याच महिन्यात निविदा काढल्या जातील, असे एका प्रश्नावर खंवटे यांनी सांगितले. १०४ कि. मी किनाऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी ही निविदा असेल तसेच कामाचे तास व मनुष्यबळात वाढ केली जाईल.

किनाऱ्यांवर वाहने नेण्यास बंदी ;  पोलिसांकडून अहवाल मागविला

कायद्याचे उल्लंघन करून समुद्रकिनाऱ्यांवर चालवल्या जाणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा अहवाल पर्यटन विभागाने पोलिसांकडे मागितला आहे. समुद्रकिनाऱ्यावर कोणतेही वाहन नेण्यास मनाई आहे. पोलिसांना वाहन जप्त करण्याचे तसेच मालकाला दंड ठोठावून गुन्हा दाखल करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत, असे सांगण्यात आले. पत्रकार परिषदेस पर्यटन खात्याचे संचालक सुनील अंचिपाका, गोवा इलेक्ट्रॉनिक्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी संचालिका श्रीमती रेवती कुमार उपस्थित होत्या.