शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

भक्तीमय वातावरणात श्री लईराई देवीच्या व्रतास आरंभ

By काशिराम म्हांबरे | Updated: April 22, 2023 13:54 IST

बरेच भक्तगण गुढी पाढव्या पासून शाहाकारी पाळून व्रत पाळण्यास आरंभ करतात. जत्रा ५ दिवसावर आल्यावर धोंड्यांच्या कडक व्रतास आरंभ होतो. 

म्हापसा : लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगाव येथील श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवानिमित्त धोंड भक्तगणांच्या कडक, पवित्र व्रतास भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला आहे.सोमवार २४ रोजी होणाऱ्या या जत्रेसाठी लहान मुलापासून ते ९० वर्षापर्यंतचे वृद्ध धोंड भक्तगण देवीचे व्रत पाळतात. त्यात महिला धोंडाचाही समावेश असतो. बरेच भक्तगण गुढी पाढव्या पासून शाहाकारी पाळून व्रत पाळण्यास आरंभ करतात. जत्रा ५ दिवसावर आल्यावर धोंड्यांच्या कडक व्रतास आरंभ होतो. 

काही जेष्ठ धोंड ३ दिवसांच्याही कडक व्रताचेपालन करतात.  पूर्ण गोवाभर विखुरलेल्या या धोंडांच्या व्रतामुळे गावांगावातून मंगलमय तसेच भक्तीमय वातावरण तयार होत असते. मंदिर किंवा नैसर्गिक तलाव किंवा एखाद्या स्वच्छ किंवा पवित्र अशा ठिकाणी एकत्रित येऊन व्रता निमीत्त तयार केलेल्या 'माटवात ' राहून हे व्रत पाळले जातात. व्रताच्या काळात स्नान करून देवी मातेच्या जयजयकाराने आहार करतात. 

आहारासाठी बनवले जाणारे खाद्य तेवढेच सोवळे, पावित्र्य  पाळून सर्वजण मिळून मिसळून एकत्रितपणेआहार बनवला जातो. परिसरातील लोकही श्रद्धेपायी धोंडांच्या जत्रेच्या आदल्या दिवशी ' व्हडले'जेवणाच्या कार्यक्रम सहभागी होण्यासाठी माटवात येत असतात. त्यांच्याकडूनही पावित्र्य कायम राहणार याची काळजी घेतली जाते. पावित्र्य राखण्यावर भर दिला जातो. यंदा रविवार २३ रोजी हा जेवणाचा कार्यक्रम आहे.

बार्देश तालुक्यातील हळदोणा इथल्या 'भाटातील ' माटवातले ८० वर्षाचे धोंड पांडुरंग बागकर गेल्या ६० वर्षाहून अधिक काळापासून देवीचेव्रत पाळतात. जत्रा पूर्वीच्या ५ दिवसापासून ते व्रत पाळण्यास आरंभ करतात. व्रताच्या काळात नामस्मरण, जप, आरत्या, भजने अशा विविध धार्मिक कार्यक्रमातून मन रमून जात असल्याची माहिती बागकर यांनी दिली.

नितेश गडेकर यांनी आपण २८ वर्षा पासून हे व्रत पाळत असल्याचे सांगून जत्रेच्या भक्तीमय वातावरणात दिवस कसे निघून जातात हे कळत नसल्याचे सांगितले. देवीवरची श्रद्धा आणि भक्ती यामुळे वातावरण अत्यंत मंगलमय असते. कसल्याच प्रकारचे विघ्न नसताना हे व्रत पाळले जातात असेही गडेकर म्हणाले.  काही धोंड पूर्वापार आलेल्या परंपरेनुसार हे व्रत पाळतात. जत्रेच्या दिवशी  हे धोंड देवीच्या तळीवर जाऊन स्नान करतात. त्यानंतर देवीच्या दर्शन घेतल्यावर अग्नी प्रवेश करून आपल्या व्रताची सांगता करतात. 

टॅग्स :goaगोवा