लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: विश्वकर्मा हा उपजत कारागिरांचा, कलाकारांचा समाज आहे. पारंपरिकतेला आधुनिकतेची सांगड घालून प्रगतीसाठी तसेच तरुणांनी आपला स्वतःचा व्यवसाय करून इतरांनाही मदतीचा हात द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. आपल्या शासनाच्या कारकिर्दीत कोणीही आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून मागे राहू नये, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्ञातींतील उद्योजक चंदन च्यारी, डॉ. पूर्णानंद च्यारी यांचा त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, तसेच भगवान विश्वकर्माची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. विश्वकर्मा च्यारी सुतार ब्राह्मण समाज संस्थेच्यावतीने कार्यशाळा दि. १८ रोजी पणजी येथील कला आणि संस्कृती संचालनालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात झाली. कार्यशाळेचा उद्देश ज्ञातींतील विद्यार्थी व तरुण होतकरू उद्योजकांसाठी प्रोत्साहित करण्यासाठी होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुषमा च्यारी यांनी केले. पाहुण्यांची ओळख कु. खुशबू च्यारी यांनी केली. दीपक च्यारी यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सुरुवात कु. दिव्या च्यारी यांच्या सरस्वती वंदनाने झाली. सुरत च्यारी व नीलिमा च्यारी यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिवादन केले. समाजबांधव कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशिक्षण कार्यशाळा
प्रशिक्षण कार्यशाळेत ईडीसी, जीईडीसी, गोवा राज्य मागास व इतर मागास वर्ग वित्त सहाय मंडळी मंडळ, खादी आणि ग्रामद्योग मंडळ, वल्ड ट्रेड सेंटरच्या मार्गदर्शनाखाली आपल्या विविध योजना विषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शैक्षणिक सत्र
संस्थेचे अध्यक्ष सुहास सोमनाथ च्यारी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले व कार्यशाळा आयोजनाचा हेतू सांगितले. सरकारच्या बहुपयोगी शैक्षणिक व औद्योगिक योजनांचा आपल्या समाज बांधवांनी लाभ घेऊन विकास साधावा, असेही आवाहन त्यांनी केले. यावेळी व्यासपीठावर वेर्ला, काणका पंचायतीच्या सरपंच आरती प्रविण च्यारी, उद्योजक चंदन च्यारी, बांधकाम ठेकेदार पुरुषोत्तम व्यारी, ज्येष्ठ सदस्य उमाकांत च्यारी, संस्थेचे अध्यक्ष सुहास च्यारी व इतर उपस्थित होते.