शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
5
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
6
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
7
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
8
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
9
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
10
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
11
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
12
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
13
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
14
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
15
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
16
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
17
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
18
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
20
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला

किनाऱ्यांची झीज

By admin | Updated: February 25, 2017 01:56 IST

पणजी : गोव्यातील १०५ किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीपैकी २०.२४ टक्के किनाऱ्यांची झीज झालेली आहे, अशा प्रकारचा निष्कर्ष

किनाऱ्यांची झीजपणजी : गोव्यातील १०५ किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीपैकी २०.२४ टक्के किनाऱ्यांची झीज झालेली आहे, अशा प्रकारचा निष्कर्ष नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेन्ट (एनसीएससीएम) या यंत्रणेने आपल्या अहवालातून काढला आहे.५२ टक्के किनारपट्टी खडकाळ स्वरूपाची आहे, असेही या यंत्रणेने म्हटले आहे. गोव्याच्या कुठच्या भागात किनारपट्टीची स्थिती कशी आहे व किती शॅक किंवा शॅकवजा झोपड्या, कॉटेजीस किनारपट्टीवर राहू शकतात याबाबतचा अहवाल तथा अंतिम मसुदा तयार करून नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेन्ट यंत्रणेने किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणास दिला आहे. या मसुद्याचा सध्या अभ्यास सुरू आहे. किनारपट्टीतील बदलाची सॅटलाईटद्वारे इमेज प्राप्त करून एनसीएससीएमने केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की, गेल्या ३२ वर्षांच्या कालावधीत गोव्याच्या किनाऱ्याची झीज होण्याच्या प्रक्रियेत व गाळमाती किनाऱ्यावर साठण्याच्या प्रक्रियेत मोठा फरक जाणवत आहे. मोरजी, बागा, कांपाल, मिरामार आणि मोबोर येथे गाळमाती आढळून येते तर केरी, हणजूण व वेळसाव येथे किनाऱ्याची झीज झाली असल्याचे स्पष्ट होते. किनारपट्टीतील भूजलावर लक्ष ठेवून भूजलाच्या दर्जाची देखरेख करण्यासाठी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने आराखडा तयार करावा, अशी शिफारस अहवालातून केली गेली आहे.गोव्यात एकूण ३९ गावे अशी आहेत, जिथे मासेमारीचा व्यवसाय चालतो. २ हजार ३७० सक्रिय असे मच्छीमार राज्यात असून त्यापैकी १ हजार ५०५ पूर्णवेळ मच्छीमार आहेत. सरकारने मासेमारीची ही गावे अधिसूचित करावी आणि तिथे मच्छीमारांना लागणाऱ्या सर्व सुविधा पुरवाव्यात, अशी शिफारस अहवालात आहे. खाजन जमिनी व वाळूच्या पट्ट्यांचे मॅपिंग करावे तसेच बागा ते सिकेरी या पट्ट्यातील खासगी जागेत शॅक्स, झोपड्या, कॉटेजीस उभे करण्यास सरसकट परवानगी देऊ नये, असेही अहवालात म्हटले आहे. गोव्यात खारफुटीची कत्तल करण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. एकूण सोळा जातींची खारफुटी गोव्यात सापडते, असे वैशिष्ट्यही नमूद केले गेले आहे.पाळोळे किनाऱ्याची क्षमता पूर्ण झाली आहे. त्यामुळे तिथे आणखी एकाही शॅकला सरकारने परवानगी देऊ नये, असे अहवालात म्हटले आहे. (खास प्रतिनिधी)