शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

तटरक्षक दल सदैव जागरूक असणे महत्त्वाचे

By admin | Updated: February 22, 2017 04:36 IST

देशातील बंदरे विकसित आणि सुरक्षित असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी तटरक्षक दल नेहमी सदैव

वास्को (गोवा) : देशाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळवून देणाऱ्या आयात-निर्यातीसाठी बहुतांशी जलमार्गाचा वापर केला जातो. त्यामुळे देशातील बंदरे विकसित आणि सुरक्षित असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी तटरक्षक दल नेहमी सदैव जागरूक असणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मंगळवारी येथे केले़वास्को येथील गोवा शिपयार्ड कंपनीने भारतीय तटरक्षक दलासाठी बांधलेल्या ‘आयसीजीएस शौनक’ या गस्ती नौकेच्या हस्तांतरण सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राजेंद्र सिंह, नौदलाचे गोवा विभागीय ध्वजाधिकारी रिअर अ‍ॅडमिरल पुनितकुमार बहल, तटरक्षक दलाचे संयुक्त महासंचालक के . नटराजन, गोवा शिपयार्डचे कार्यकारी संचालक निवृत्त रिअर अ‍ॅडमिरल शेखर मित्तल व शौनक जहाजाचे नेतृत्व करणारे कमांडिंग आॅफि सर उपमहासंचालक टेकुर शशीकुमार आदी उपस्थित होते़ संरक्षण मंत्रालयाने भारतीय तटरक्षक दलासाठी ६ अत्याधुनिक गस्ती नौका बांधण्याचे काम गोवा शिपयार्ड कंपनीकडे दिले असून या मालिकेतील ‘आयसीजीएस शौनक’ ही चौथी नौका आहे़ ही नौका मुदतीपूर्वी ६२ दिवस आधीच बांधून पूर्ण करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)‘आयसीजीएस शौनक’ची वैशिष्ट्ये१०५ मीटर लांबीची ही नौका पूर्णपणे भारतीय बनावटीची आहे़ त्यावर अत्याधुनिक जलवाहतुकीची व दळणवळणाची यंत्रणा, सेन्सर आणि अन्य यंत्रसामग्री आहे़ या नौकेवर ३० मिमी क्षमतेची नौदल तोफ, इंटिग्रेटेड ब्रीज सिस्टम, इंटिग्रेटेड मशिनरी कंट्रोल सिस्टम, पॉवर मॅनेजमेंट सिस्टम आणि हाय पावर एक्सटर्नल फ ायर फ ायटिंग पद्धतीची यंत्रणाही आहे़ तसेच दोन इंजिनाचे हेलिकॉप्टर आणि पाच वेगवान बोटी वाहून नेण्याची सुविधाही नौकेवर आहे़ या नौकेची कमाल वेग २६ सागरी मैल आहे. नौकेवर १४ अधिकारी आणि ९८ जवान तैनात असतील.