शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
3
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
4
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
5
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
6
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
7
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
8
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
10
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
11
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले
12
ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक
13
Accident: पाण्याचा टँकर आणि दुचाकीत भीषण धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
14
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
15
VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...
16
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, स्वतः दिली माहिती
18
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
19
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
20
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार

युती सरकारांचे बुरसटलेले राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 20:44 IST

राजकारणी ही या पृथ्वीतलावरची सगळ्यांत हीन प्रजाती असल्याचे विधान अमेरिकन जनरल जॉर्ज पॅटननी केले होते.

राजकारणी ही या पृथ्वीतलावरची सगळ्यांत हीन प्रजाती असल्याचे विधान अमेरिकन जनरल जॉर्ज पॅटननी केले होते. त्या बिरबलाच्या कथेतील हौदातल्या माकडीणीप्रमाणे नाकापर्यंत पाणी चढायला लागले की स्वत:च्या स्वार्थापोटी सगळी मूल्ये, तत्त्वे पायदळी तुडवणाऱ्या राजकारण्यांच्या देशातील इतर भागांतल्या कारवाया आपण पाहात आलोय.

गोव्याच्या दिवंगत मुख्यमंत्र्यांच्या अंत्यविधीच्या दिवशी हा प्रकार आपल्या येथे जवळून पाहायला मिळाला. अंतिम दर्शनासाठी लोटलेल्या जनसमुदायात दोन प्रकारच्या भावना प्रकर्षाने दिसल्या. आप्तेष्ट आणि जनसामान्यांच्या चेहऱ्यावर दु:ख ओसंडत होते; पण यात एक चमू असाही होता जो दु:खग्रस्त कमी आणि चिंताग्रस्त जास्त दिसत होता. तो होता जनप्रतिनिधी आणि मंत्रिगणांचा. त्यातले सत्तापक्ष आणि युतीतले ज्येष्ठ आपली पुढची चाल ठरवण्यात व्यग्र असावेत तर कनिष्ठ ‘अब अपना क्या होगा’ या विवंचनेत.

राजकारण्यांतर्फे श्रध्दासुमने, भावभीनित श्रध्दांजली वाहणे जगाला दाखवले जात असताना पडद्यामागे मात्र सरकार स्थापनेसाठी युती घडवून आणण्याचे अनेक अंकी बहुपात्रीय भन्नाट राजकीय नाट्य चालू होते. त्यात साम, दाम, दंड, भेद समावेशी सामोपचार, शह, काटशह, दगाबाजी, सस्पेन्स असलेले सगळे सीन होते. मुख्य म्हणजे पटकथा उत्स्फूर्त असल्याने वेळ जात होता तसा तिच्यात बदल घडवले जात होते. भाजप आणि काँग्रेस यांना मुळात भीती वाटत होती ती रात्रीच्या काळोखात खंजीर घेऊन हिंडणाºया स्वकीयांची. कोण कोणत्या घटकेला आपल्या पाठीत खंजीर खुपसून विरोधकांच्या तंबूची वाट धरेल याचा नेम नव्हता.

तिथे सरणावरच्या निखाऱ्यांची धग निवलीही नव्हती आणि येथे नव्या मुख्यमंत्र्यांचा आणि काही भावी मंत्र्यांचा शपथविधीही पार पडला. कारण उद्याची शाश्वती नव्हती. ‘कल किसने देखा है’ म्हणतात ते यासाठीच.त्यात विशेष म्हणजे नवा दिवस उजाडला तो राज्याच्या ‘उध्दारा’साठी दोन नव्या कोºया उपमुख्यमंत्र्यांचे लेणे घेऊन. सत्तास्वाद घ्यायला निघालेल्या काँग्रेसवाल्यांचे तोंड परत एकदा आंबट झाले. त्यांच्यात सर्वच स्वयंघोषित मुख्यमंत्री आणि मंत्रिगण भरलेत. त्यामुळे कसलाही निर्णय झाल्यास कोणीतरी हमखास काडी घालतो. त्यांना सरकार स्थापण्यासाठी केवळ एक मार्ग उरतो. तीन मुख्यमंत्री बनवायचे आणि सहा उपमुख्यमंत्री.

स्व. पर्रीकर हे साध्या राहणीचे, मनमिळावू, कामात स्वत:ला झोकून देणारे गुणी माणूस होते यात मुळीच शंका नाही; पण राजकारणातील अपरिहार्यतेमुळे घ्याव्या लागणाºया निर्णयांमुळे या गुणानां कुठेतरी ग्रहण लागले. राजकारणात हरिश्चंद्रांना स्थान नसते. तेथे वावरत असतात ते धूर्त मॅकियावेली आणि चाणक्य. गेल्या विधानसभेत कमी जागा पदरी पडल्यामुळे सत्तास्थापनेच्या निकडीपोटी युती घडवून आणण्याच्या दिशेने पर्रीकरांना स्वत: ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले अशांना आणि खुद्द त्यांच्यावर आरोप करणाºयांना निमंत्रित करून त्यांच्या पंक्तीत बसून युतीचे घोंगडे विणण्याची नामुष्की ओढवून घ्यावी लागली होती. कैकवेळा राजकारणातील असहायतेमुळे दिलेला शब्द उचलून धरता आला नसल्याने यू टर्न घ्यायचीही पाळी आली. सरकारचा राजधर्म पाळणेसारख्या वाक्प्रचारांचा हल्ली सुळसुळाट वाढलाय. खरे तर युती सरकार म्हणजे मतदारांवर उपकार करत असल्याचा आव आणत स्वार्थासाठी मूल्ये, तत्त्वे खुंटीला टांगून एकत्र आलेला जमावडा एवढीच काय ती त्याची व्याख्या.

निवडणुकांत मत टाकून झाल्यावर मतदाराच्या बोटाला शाईचा स्पर्श होताच आपल्या लोकशाहीतील मतदानाच्या हक्काचा, कर्तव्याचा भाग येथेच संपतो. तद्नंतर आमदाराने पक्ष बदलत कितीही कोलांट्या उड्या मारल्या तरी स्थितप्रज्ञ मतदाराला त्याच्याशी काही देणेघेणे नाही. त्यामुळे विरोधकांशी संधान साधण्यापूर्वी आपल्या मतदारांशी संवाद साधण्याची गरजही आज आमदाराला तशी वाटत नसते. समजा मतदार नाराज झालाच तर पुढची निवडणूक येईपर्यंत त्याची समजूत यशस्वीपणे कशी काढायची ती कला त्याला आज अवगत झालीय. त्यामुळे दोन-तीन पक्षांची वारी करूनही यशस्वीरीत्या अनेक वर्षे राजकारणात फतकल मारून बसलेले अनेक महारथी आपण पाहतोय.सगळ्या पक्षांत पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांचा गट असतो. पक्षाचे आमदार, नेते यांच्यावर हे बंधन नसते. हल्ली काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेल्या शिरोडकर, सोपटे द्वयींची मागच्या निवडणुकीत खिल्ली उडवणारे भाजपचे कार्यकर्ते आता त्यांना डोक्यावर घेऊन नाचतील तर या उलट मागच्या निवडणुकीत त्यांचा जयजयकार करत गळा फाडणारे काँग्रेस कार्यकर्ते आता त्याच्या नावाने शंख करतील. घटक पक्षांचे रुसवे फुगवे दूर करणे, समेट घडवून आणणे ही तारेवरची कसरत करण्यातच युती सरकारांचा वेळ जात असल्याने जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तसा तो कमीच उरतो. पण युतीविना यापुढेही या गोव्यात सरकार घडणे अशक्यप्राय. हे पचनी पाडून घेतल्याशिवाय जनतेलाही दुसरा पर्याय नाही.

- दीपक लाड (राजकीय भाष्यकार)

टॅग्स :goaगोवा