शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
3
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
4
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
5
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
6
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
7
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
8
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
9
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
10
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
11
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
12
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
13
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
14
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
15
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!
16
Atharva Sudame: पुण्याचा रीलस्टार ते थेट राज ठाकरेंशी मैत्री; कोण आहे अथर्व सुदामे?
17
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
18
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
19
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
20
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे

तेरेखोलमधून बंदोबस्तात कोळसा वाहतूक

By admin | Updated: February 9, 2015 01:12 IST

महाराष्ट्र सागरी संरक्षण पोलिसांची दमदाटी

मांद्रे : तेरेखोल नदीमधून बेकायदा बार्जवाल्यांनी माशांची जाळी उद््ध्वस्त करून महाराष्ट्र कोस्टल दलाच्या पोलिसांच्या मदतीने मच्छीमारांना दमदाटी करून रविवारी कोळशाची बेकायदा वाहतूक केली. दुपारी १२.३० वा. केरी तेरेखोलचे पंच सदस्य डायगो फ्रान्सिस रॉड्रिगीस, पंच सदस्य यशवंत नार्वेकर, पंच सदस्य रत्नाकर हर्जी, तसेच समाजसेवक जनार्दन कासकर व इतर बेकायदा बार्ज वाहतुकीबद्दल जाब विचारण्यासाठी बार्जजवळ गेले असता बार्जच्या कॅप्टनने महाराष्ट्र सागरी पोलिसांना बोलावून घेतले. त्या पोलीस अधिकाऱ्यांनी पंच मंडळींना सहकार्य न करता उलट हुसकावण्याचा प्रयत्न केला. पंचायत मंडळाने ग्रामसभेमध्ये तेरेखोल नदीतून कुठल्याही प्रकारच्या खनिज वाहतुकीसाठी निर्बंध घालण्याचा ठराव संमत केला असल्याचे सांगितले. मात्र, महाराष्ट्र सागरी पोलीस ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. एका पंचाने ‘तुम्ही गोव्याच्या हद्दीत येऊन दादागिरी करता’, असे सांगताच वातावरण तंग बनले होते. किरणपाणी जेटीवर संपूर्ण कोळसा खाली केल्यानंतर पुन्हा कोळसा आणण्यासाठी समुद्रामध्ये बार्ज निघाली. तेरेखोल किल्ल्याच्या जवळ समुद्रातील दगडावर बार्ज आपटून अडकून पडली. समुद्राच्या लाटांमुळे बार्ज खडकांवर आपटून खडक फुटण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे किल्ल्याच्या बुरुंजालाही धोका पोहचू शकतो, असे मच्छीमारांचे म्हणणे आहे. गोव्यातील नदीशी निगडित असलेली सगळी खाती निस्तेज किंवा बरबटलेली आहेत, असा आरोप पंच रॉड्रिगीस यांनी केला. गोवा सरकारच्या सगळ््या खात्यांना बेकायदा बार्ज (खनिज) मधून कोळसा वाहतुकीसंदर्भात दूरध्वनी करूनही काहीच उपयोग झाला नाही, असे ते म्हणाले. या कोळसा वाहतुकीकडे संबंधित खाती जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे सांगून ते म्हणाले की, रिकामी बार्ज लाटांमुळे खडकांवर आपटून धोका निर्माण होऊ शकतो. दरम्यान, या बेकायदा कोळसा वाहतुकीवर निर्बंध घालण्याची मागणी मच्छीमारांनी केली. (प्रतिनिधी)