लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी २५ मे रोजी सकाळी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष जे. आर. रिबेलो यांनी दिली.दहावीची परीक्षा १ ते २१ एप्रिलपर्यंत घेण्यात आली होती. राज्यभरातील २७ केंद्रांवरून १९ हजार ३६२ विद्यार्थी यंदा या परीक्षेसाठी बसले होते. सध्या पेपर तपासणी पूर्ण झाली आहे. निकाल पुढे जाऊ शकतो; पण २५ मेआधी निकाल जाहीर होणार नसल्याचे ते म्हणाले. निकाल दहा दिवसांवर येऊन ठेपला असून बारावीच्या निकालानंतर आता दहावीच्या निकालावर विद्यार्थी व पालकांचे लक्ष आहे.२५ रोजी वेबसाईटवर निकाल जाहीर करण्यात येईल. तसेच एसएमएस व आयव्हीआरएसद्वारे उपलब्ध करण्यात येईल. निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून गुणपत्रिकांचे वितरण विद्यालयांमध्ये केले जाणार आहे. निकालपत्रांची औपचारिकता झाल्यानंतर उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
दहावीचा निकाल २५ रोजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2017 02:26 IST