शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नाताळाची तयारी अंतिम टप्प्यात; गोव्यात विद्युत रोषणाई

By काशिराम म्हांबरे | Updated: December 23, 2023 13:42 IST

गोठे बनवताना माती तसेच वाळूचा वापर केला जातो. त्यात गहू किंवा नाचणी रुजवून ते उगवले जातात.

म्हापसा - गोव्यातील धार्मिक एकतेचे, सलोख्याचे आदर्श असे उदाहरण असलेला, धार्मिक सीमांचे उल्लंघन करुन सर्वांना एकत्रित आणणाऱ्या व एकत्रीतपणे नांदवणारा नाताळ सण एका दिवसावर येऊन ठेपलेला आहे. सर्व धर्मातील लोकांचे नाते दृढ करणारा ख्रिस्ती बांधवांच्या येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा होणाऱ्या या सणाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. विद्युत रोषणाईने परिसर उजळून गेला आहे.

सणाचे सर्वात मोठे आकर्षण असलेला येशू ख्रिस्ताच्या जन्माचा देखावा अर्थात गोठे (क्रिब्स)  तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. गोठे तयार करताना अत्याधुनिक सुविधांचा, नवीन तंत्राचा वापर करण्यात आला आहे. मात्र त्या मागची परंपरा, संस्कृती नष्ट होणार नाही याची काळजी बाळगण्यात आली आहे. पूर्व तयारीचा एक भाग म्हणून अनेक चर्चीत प्रार्थना सभांचे आयोजन करण्यात आले आहे. सणा निमीत्त कॅरल गीतांच्या मधुर धुंदीतून वातावरणाची निर्मिती करण्यात आली आहे. गावा गावांतून कॅरेल गितांचे गायन, हातात कंदील, पारंपारिक नाताळाची वेषभूषा करून फेºया काढण्यात आल्या आहेत.  बाजारपेठाही नाताळाच्या सामानांनी भरून गेल्या आहेत.

गोठे बनवताना माती तसेच वाळूचा वापर केला जातो. त्यात गहू किंवा नाचणी रुजवून ते उगवले जातात. गोठ्यावर छप्पर तसेच भिंती बनवण्यासाठी सुकलेल्या गवताचा, माडांच्या झावळीचा वापर केला जातो. गोठ्यात गुरांसोबत, बकऱ्या, मेंढरे, घोडे, उंट किंवा इतर जनावरांच्या प्रतिकृती वापरुन गोठ्याचे स्वरुप दिले जाते. चर्च परिसरातील गोठा आकाराने सर्वात मोठा बनवला जातो. गोठ्याला नैसर्गिक बनवण्यासाठी त्याला आकर्षक किंवा सुंदर बनवण्यासाठी वाहते पाण्याचे पाट, बफार्चा देखावा करायचा असल्यास कापसापासून बनवलेले बर्फाचेढग काही वेळा वाळवंटातील दृष्य सुद्धा बनवले जाते. देखाव्यानुसार गोठ्याच्या मागच्या बाजूला डोंगराचे दृष्य सुद्धा तयार केले जाते.

गुलाबी थंडीच्या दिवसात साजरा होणाऱ्या या नाताळच्या सणातील गोठे नवीन वर्षाच्या आगमनापर्यंत कायम ठेवले जातात. तयार केलेले गोठ्यांचेहे देखावे पाहण्यासाठी लोकांची गर्दी सुद्धा होत असते. विविध धर्मातील लोक आपआपसातील धर्माच्या सीमा, मर्यादा विसरुन एकमेकांच्या घरी जाऊन सणाच्या शुभेच्छा देतात. शुभेच्छा देताना सणानिमित्त बनवलेले गोडधोड पारंपारिक पदार्थाची चव घेण्यास विसरत नाहीत. घरात बनवलेले हे पदार्थ एकमेकांना वाटण्याची परंपरा आज सुद्धा पाळली जाते. त्यामुळे सर्व धर्मात आनंद वाटणारा, वाढवणारा सण म्हणून नाताळ सणाकडे पाहिले जाते. निसर्गाच्या सानिध्यात जन्माला येणाºया येशू ख्रिस्ताच्या जन्माचा हा सोहळा समाजातील सर्वांना सुखदायी तसेच आनंदायी ठरत असतो.