शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पणजीत पर्रीकर विरुद्ध चोडणकर सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 23:33 IST

विधानसभा पोटनिवडणूक : वाळपईत रॉय नाईक यांना तिकीट

पणजी : गोवा प्रदेश काँग्रेस पक्षाने विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी पणजी मतदारसंघात गिरीश चोडणकर व वाळपई मतदारसंघात रॉय नाईक यांचे नाव उमेदवार म्हणून मंगळवारी निश्चित केले. ही दोनच नावे मंजुरीसाठी प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी मंगळवारी अखिल भारतीय काँग्रेस समितीकडे पाठवली. भाजपचे उमेदवार असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर विरुद्ध काँग्रेसचे चोडणकर असा सामना पणजीत होणार आहे.प्रथम बाबूश मोन्सेरात यांनी काँग्रेसला धक्का दिला व मग अ‍ॅड. सुरेंद्र देसाई, अशोक नाईक या दोघांनी काँग्रेसच्या तिकीटाची आॅफर पणजीत नाकारल्यानंतर काँग्रेस पक्षासमोर उमेदवार निवडीबाबत मोठासा पर्यायच शिल्लक राहिला नव्हता. गिरीश चोडणकर यांना पणजीच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरवावे असे काँग्रेसने ठरवले. काँग्रेसचे गोवा प्रभारी चेल्लाकुमार यांनी चोडणकर यांचे नाव अगोदरच विचारात घेतले होते. अखिल भारतीय काँग्रेसकडून बुधवारी सकाळी चोडणकर यांचे नाव मंजूर केले जाईल. उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाºयांकडे सादर करण्यासाठी दि. ५ आॅगस्टपर्यंत मुदत आहे. वाळपई मतदारसंघातून रॉय नाईक यांच्या नावावर गोवा प्रदेश काँग्रेसने शिक्कामोर्तब केले आहे.चोडणकर यांनी पणजीतून व रॉय यांनी वाळपईमधून यापूर्वी कधीच विधानसभेची निवडणूक लढवलेली नाही. चोडणकर यांचा सामना मुख्यमंत्र्यांविरुद्ध आहे, तर रॉय यांना वाळपईत मंत्री विश्वजित राणे यांच्याशी टक्कर द्यावी लागेल. पणजीत काँग्रेसच्या उमेदवार निवडीबाबत खूप घोळ झाला. वाळपईत काँग्रेसचे तिकीट अगोदरच ठरले. पणजीत एकेकाळी काँग्रेसच्या तिकीटासाठी अनेक दावेदार असायचे; पण यावेळी तिकीट स्वीकारण्यासही कोणी पुढे येईनासे झाले. २०१७च्या विधानसभा निवडणुकीवेळी पणजीत काँग्रेसने उमेदवार उभा केला नव्हता. त्या पक्षाने मोन्सेरात यांना पाठींबा दिला होता व मोन्सेरात हे युजी पार्टीच्या तिकिटावर लढले होते.