शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

चॉकलेट, पेन चोरले; झाली शिक्षा, वृद्धाश्रमात समाजसेवा करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 11:51 IST

परीक्षेनंतर वस्तू मागे तशाच सोडून देण्यात आल्या आहेत, असा दावा विद्यार्थ्यांनी केला. विद्यार्थ्यांनी वस्तू परत केल्या आणि माफी मागितली.

पणजी : गोव्यातील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स पिलानी या संस्थेतील एका परिषदेदरम्यान पेन, बटाटा चिप्स, चॉकलेट्स, सॅनिटायझर, पेन, नोटपॅड, मोबाइल स्टँड, दोन डेस्क लॅम्प आणि तीन ब्लूटूथ स्पीकर आदी वस्तू चोरल्याबद्दल महाविद्यालयाने दोन विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यापासून मज्जाव केला होता. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात पोहोचल्यावर न्यायालयाने विद्यार्थ्यांना दिलासा देत दोन महिने दररोज २ तास समाजसेवा करण्याचे निर्देश दिले.

वस्तू परत करून मागितली होती माफीपरीक्षेनंतर वस्तू मागे तशाच सोडून देण्यात आल्या आहेत, असा दावा विद्यार्थ्यांनी केला. विद्यार्थ्यांनी वस्तू परत केल्या आणि माफी मागितली. संस्थने पाचही विद्यार्थ्यांना तीन सेमिस्टरसाठी नोंदणी करण्यापासून रोखले होते आणि प्रत्येकी ५०,००० रुपयांचा दंड ठोठावला होता.

संचालक का संतापले?न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती एम. एस. सोनक यांच्या खंडपीठाने सोमवारी संस्थेचा हा निर्णय रद्दबातल ठरवला.  विद्यार्थ्यांच्या याचिकांवर सुनावणी करताना, कोर्टाने दोन वेळा आपला निर्णय पुढे ढकलला जेणेकरून संस्थेचे संचालक शिक्षेवर पुनर्विचार करू शकतील; पण तसे झाले नाही.  विद्यार्थ्यांनी संस्थेच्या निर्णयाविरोधात न्यायालयीन हस्तक्षेप करण्याची मागणी करत याचिका दाखल करण्याची हिंमत दाखवली, त्यामुळे संचालक संतापले असे दिसते. याचिकाकर्त्यांना ५० हजारांच्या दंडासह विद्यार्थ्यांना माजोर्डा गावातील वृद्धाश्रमात समाजसेवा करण्याचे निर्देश कोर्टाने दिले.

टॅग्स :Courtन्यायालय