शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

बालकांत त्वचारोगाची साथ

By admin | Updated: October 10, 2014 01:38 IST

पणजी : राज्यात ‘हँड फुट माउथ’ या लहान मुलांना होणाऱ्या संसर्गजन्य त्वचारोगाची साथ पसरली असून सरकारी व खासगी दवाखान्यांत मुलांना घेऊन मोठ्या प्रमाणावर

पणजी : राज्यात ‘हँड फुट माउथ’ या लहान मुलांना होणाऱ्या संसर्गजन्य त्वचारोगाची साथ पसरली असून सरकारी व खासगी दवाखान्यांत मुलांना घेऊन मोठ्या प्रमाणावर पालकांच्या रांगा लागल्या आहेत. पणजी, मडगाव, म्हापसा, वास्को, केपे व काणकोणमध्ये ही साथ पसरल्याची माहिती त्या ठिकाणच्या सरकारी व खासगी दवाखान्यांतून देण्यात आली. मुलांना घेऊन खासगी दवाखान्यांत पालकांच्या रांगा लागत आहेत. पणजीतही ही साथ मोठ्या प्रमाणावर असल्याची माहिती बालरोगतज्ज्ञ वीरेंद्र गावकर यांनी दिली. या रोगाची लागण झालेल्या मुलांना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयातही आणले जात असल्याची माहिती गोमेकॉतील दोन बालरोगतज्ज्ञांकडून देण्यात आली. गोमेकॉतील बालरुग्ण विभागाच्या प्रमुख असलेल्या डॉ. मिनी सिल्वेरा यांना विचारले असता, या रोगाची लागण झालेली मुले ओपीडीत येत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘हँड फुट माउथ’ असे या रोगाचे अ‍ॅलोपॅथिक नाव असून आयुर्वेदात हा रोग संक्रामक व्याधीच्या गटात येतो. हा रोग ६ महिन्यांच्या मुलापासून ५ वर्षांच्या मुलांनाही होऊ शकतो. हातापायांवर पुरळ उठतात, पोटावर आणि तोंडावरही पुरळ येतात. त्यामुळे असह्य खाज सुटते. त्याची सुरुवात तोंडापासून होते. तोंडात लहान फोड येतात. त्यामुळे खाताना त्रास होतो. (प्रतिनिधी)