शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

गोव्यात मुख्यमंत्री रोजगार हमी योजनेचा 7 हजार जणांना लाभ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 12:53 IST

गोव्यात मुख्यमंत्री रोजगार हमी योजनेचा तब्बल 7 हजार जणांनी लाभ घेतला असून या योजनेंतर्गत आतापर्यंत 80 कोटी रुपये वितरित झाले आहेत. आर्थिक विकास महामंडळातर्फे (ईडीसी) राबवल्या जाणा-या या अल्पव्याजी कर्जाच्या माध्यमातून दिवसाकाठी सरासरी चारजण उद्योजकतेकडे वळत आहेत. 

पणजी : गोव्यात मुख्यमंत्री रोजगार हमी योजनेचा तब्बल 7 हजार जणांनी लाभ घेतला असून या योजनेंतर्गत आतापर्यंत 80 कोटी रुपये वितरित झाले आहेत. आर्थिक विकास महामंडळातर्फे (ईडीसी) राबवल्या जाणा-या या अल्पव्याजी कर्जाच्या माध्यमातून दिवसाकाठी सरासरी चारजण उद्योजकतेकडे वळत आहेत. 

महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येंकर म्हणाले की, ‘ही योजना आता अधिक सुटसुटीत करण्यात आली आहे. गरजू तरुणांना उद्योगासाठी अर्थसाहाय्य मिळावे म्हणून गावागावात शिबिरे घेतली जातात. सीडीपीआर आणि वेर्णा येथील आग्नेल आश्रम या संस्थांकडे हातमिळवणी केली असून या संस्थांचे प्रतिनिधी गावागावात जाऊन मार्गदर्शन करतात. गरजूंना या योजनेसाठी अर्ज भरुन देणे तसेच अन्य तत्सम कामे करतात. आतापर्यंत 7 हजार उद्योजक तयार केले असून सुमारे 80 कोटी रुपये वितरित झालेले आहेत.’

छोट्या-मोठ्या उद्योगांमध्ये गुंतवणुकीसाठी कर्ज या योजनेच्या माध्यमातून दिले जाते. सरकारने अलीकडेच या योजनेसाठी उत्पन्न आणि वयोमर्यादा शिथिल केलेली आहे. वार्षिक 10 लाख रुपये उत्पन्न असलेल्यांनाही आता लाभ मिळणार आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक गरजूंना घेता यावा आणि उद्योजकता वाढावी यासाठी योजनेतील काही अटी शिथिल करण्यात आल्या आहेत.

उत्पन्नमर्यादा तसेच वयाच्याबाबतीत सवलत देण्यात आलेली आहे. 18 ते 45 वर्षे वयापर्यंतची व्यक्ती आता या योजनेत उद्योग, व्यवसायासाठी कर्ज मिळवू शकते. विधवा, अपंग,  मागास, अनुसूचित जमाती व ओबीसी यांना 5 वर्षांची शिथिलता देण्यात आलेली आहे. पात्रतेसाठी वार्षिक उत्पन्नमर्यादा ३ लाख रुपयांवरुन १0 लाख रुपये करण्यात आली आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दहा लाख रुपयांपर्यंत असले तरी या योजनेचा लाभ घेता येईल. 

सिद्धार्थ कुंकळ्येंकर, अध्यक्ष, ईडीसी 

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर