शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

फेरीबोट भाड्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील - सुभाष फळदेसाई

By किशोर कुबल | Updated: November 3, 2023 14:57 IST

"लोकांची इच्छा नसेल तर सरकार त्यानुसार निर्णय घेईल. गरज पडल्यास मुख्यमंत्री हस्तक्षेप करतील."

पणजी : फेरीबोट भाड्याबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी जनतेच्या भावनांचा विचार केला जाईल, असे नदी परिवहनमंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले. लोकांची इच्छा नसेल तर सरकार त्यानुसार निर्णय घेईल. गरज पडल्यास मुख्यमंत्री हस्तक्षेप करतील, असे ते म्हणाले. फेरीबोट प्रवासासाठी दुचाक्यांना तिकीट लागू करण्याबरोबरच चारचाकींसाठी तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केल्याने लोकांमध्ये संतप्त भावना आहे त्या पार्श्वभूमीवर खात्याचे मंत्री फळदेसाई यांना विचारले असता ते म्हणाले की, ' या प्रश्नावर आम्ही आमदार आणि स्थानिक नेत्यांशीही बोलू. पण माझे असे प्रामाणिक मत आहे की, त्यांनी हा प्रस्ताव स्वीकारला पाहिजे.फळदेसाई पुढे म्हणाले की,  दुचाकींसाठी तिकीट सुरू करणे आणि चारचाकी वाहनांसाठी फेरीबोट प्रवासभाडे वाढवणे यामागचा उद्देश महसूल गळती रोखणणे व डिजिटायझेशन करून महसूल मिळवणे हा आहे. ते म्हणाले की, मोफत फेरी सेवा देण्यासाठी सरकार वर्षाकाठी ४५ ते ५० कोटी रुपये खर्च करत आहे. तिकीट व पासेस च्या माध्यमातून वर्षासाठी चार ते पाच कोटी रुपये मिळाले तरीजुन्या फेरीबोटी मोडीत काढून हा महसूल अत्याधुनिक नवीन फेरीबोटी खरेदी करण्यासाठी वापरता येईल.पास घेण्याची आणि नूतनीकरणाची तसेच दैनंदिन तिकीट काढण्याची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल केली जाणार आहे कारण यापूर्वी तिकीट कलेक्टरनी केलेला घोटाळा व त्यांच्या वरील कारवाई सर्वश्रुत आहे. कोणत्याही परिस्थितीत महसूल गळती रोखली जाईल.

फेरीबोटी पाण्यावर चालतात का?, हॉटेलात  चहासाठी गेलात तर सहाशे रुपये खर्च करत नाही का?- फळदेसाईंचा सवाल

फेरीबोटींसाठी इंधन तसेच इतर गोष्टींवर खर्च करावा लागतो त्या पाण्यावर चालतात का?, असा सवाल करून फळदेसाई म्हणाले की, हॉटेलात चहा पिण्यासाठी मित्रांबरोबर गेलात तरी तरी सहाशे रुपये खर्च होतात. त्यामुळे तिकीट भाड्यावर गळा काढणे योग्य नव्हे. दुचाकींसाठी महिन्याचा १५० रुपयांचा पास काढला तरी प्रति ट्रिप ५ रुपये आणि चार चाकींसाठी सहाशे रुपयांचा पास काढला तरीप्रति ट्रीप १० रुपये खर्च येईल. हे सहज परवडण्यासारखे आहे. 

टॅग्स :goaगोवा