शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती स्थिर; पण अफवांना ऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 17:24 IST

गेल्या शनिवारी रात्री अचानक बांबोळी येथील गोमेकॉ  रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झालेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती आता स्थिर आहे.

ठळक मुद्देगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती आता स्थिर आहेदिल्लीतील एम्स रुग्णालयाचे डॉ. प्रमोद गर्ग यांनी गोव्यात येऊन मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याची पूर्ण तपासणी केलीपर्रीकर यांची प्रकृती स्थिर झाली तरी, राजकीय अफवांना मात्र ऊत आला आहे

पणजी : गेल्या शनिवारी रात्री अचानक बांबोळी येथील गोमेकॉ  रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झालेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती आता स्थिर आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयाचे डॉ. प्रमोद गर्ग यांनी गोव्यात येऊन मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याची पूर्ण तपासणी केली. पर्रीकर यांची प्रकृती स्थिर झाली तरी, राजकीय अफवांना मात्र ऊत आला आहे.

पर्रीकर यांच्यावर एन्डोस्कॉपी केली जाईल, असे अगोदर जाहीर करण्यात आले होते पण एन्डोस्कॉपी करता आली नाही, असे सुत्रंनी सांगितले. पर्रीकर यांच्या पोटात पूर्वी रक्तस्राव व्हायचा पण उपचाराअंती तो थांबला. पर्रीकर अजुनही बांबोळी येथील गोमेकॉ  रुग्णालयातच आहेत. आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी या रुग्णालयाला भेट दिली व डॉक्टरांशी चर्चा केली. पर्रीकर खूप आजारी असल्याने गोव्यात आता तातडीने नेतृत्व बदल होईल, अशा अफवा दिवसभर राज्यभर पसरल्या होत्या. मात्र तसे काहीही नाही, असे भाजप नेत्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने ट¦ीटरवरून सोमवारी एक निवेदन केले. एम्सचे डॉ. प्रमोद गर्ग यांच्या नेतृत्वाखाली पर्रीकर यांच्यावर उपचार केले जात आहेत. गर्ग यांनी पर्रीकर यांची पूर्णपणे तपासणी केली. पर्रीकर यांच्या प्रकृतीत झालेल्या सुधारणोविषयी डॉक्टर आनंदित आहेत, असे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने म्हटले आहे.

माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यासह भाजपच्या काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी गोमेकॉ रुग्णालयाला भेट दिली. पर्रीकर यांना कुणाला भेटू दिले जात नाही. पर्रीकर यांना विश्रंतीची गरज असल्याने त्यांच्या जवळही जास्त कुणाला पाठविले जात नाही. आरोग्य मंत्री राणे यांनी सांगितले की, पर्रीकर यांच्या आरोग्याच्या सद्यस्थितीविषयी काही प्रसार माध्यमे अपप्रचार करत आहेत. चुकीची माहिती पसरविली जात आहे. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा