शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर 8 सप्टेंबरला गोव्यात परतणार - भाजपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 19:16 IST

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अमेरिकेहून उपचार घेऊन येत्या  8 सप्टेंबरला गोव्यात परततील, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले.

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अमेरिकेहून उपचार घेऊन येत्या  8 सप्टेंबरला गोव्यात परततील, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले.

 प्रारंभी मुंबईतील लिलावती इस्पितळात उपचार घेणारे मनोहर पर्रीकर हे मुंबईहून गुरुवारी पहाटे अमेरिकेत दाखल झाले. त्यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी उपेंद्र जोशी हेही आहेत. मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी न्यूयॉर्कमधील स्लोन केटरींग स्मृती फाऊंडेशन इस्पितळात तपासणी करून घेतली आहे. 

दिल्लीहून शुक्रवारीच गोव्यात परतलेले भाजपा प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर यांना पत्रकारांनी मनोहर पर्रीकर यांच्याविषयी विचारले असता, ते म्हणाले की, मनोहर पर्रीकर येत्या 8 सप्टेंबरला गोव्यात परतल्यानंतर लगेच भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीतही भाग घेतील. तसेच,  9 सप्टेंबरला दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक होईल. मुख्यमंत्रीपदाचा कारभार पुढे नेण्याबाबत मनोहप पर्रीकर हे सक्षम आहेत. ते कार्यक्षमपणे राज्य कारभार हाताळत आहेत व त्यामुळे नेतृत्व बदलाचा प्रश्न येत नाही.

मनोहर पर्रीकर हे गेल्या 10 ऑगस्टला अमेरिकेत गेले होते. त्यानंतर  22 ऑगस्टला गोव्यात परतले होते. यावेळी त्यांना पुन्हा अमेरिकेत उपचारांसाठी जावे लागले. ते फक्त कन्सल्टेशनसाठी गेले आहेत, असा भाजपाचा दावा आहे.

दरम्यान, मनोहर पर्रीकर यांच्या अनुपस्थितीचा गोव्याच्या प्रशासनावर मोठा परिणाम होत असल्याचे काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांचे म्हणणे आहे. काँग्रेसने याविरुद्ध आंदोलन छेडण्याची गरज आहे. केवळ एका नेत्यासाठी प्रशासन ठप्प करून ठेवता येत नाही.  मनोहर पर्रीकर यांनी कामाचा ताबा दुस-या कुठच्याच मंत्र्याकडे दिलेला नाही, असे रेजिनाल्ड म्हणाले. रेजिनाल्ड यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाने सरकारविरोधात निषेधासाठी रस्त्यावर उतरावे अशी हाक शुक्रवारी दिली.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा