शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांचे १२ किल्ले युनेस्कोच्या यादीत समाविष्ट हा ऐतिहासिक, अभिमानास्पद आणि गौरवशाली क्षण - CM प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 05:29 IST

किल्ल्यांचे शत्रूस गूढ वाटणारे प्रवेशद्वार, संरक्षणाची रणनीती व स्थापत्यशास्त्रीय उत्कृष्टता ही जगात कुठेही सापडणार नाही, अशी मराठ्यांची अमूल्य देणगी आहे. हेच खरे.'

किशोर कुबल

पणजी : 'ऐतिहासिक, अभिमानास्पद आणि गौरवशाली क्षण,' अशा शब्दांत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट केल्याबद्दल अभिनंदन केले. हा केवळ महाराष्ट्रासाठी नाही, तर संपूर्ण भारतासाठी गौरवाचा क्षण आहे, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले. 

युनेस्कोने 'अद्वितीय वैश्विक मूल्य' म्हणून ज्या किल्ल्यांचा समावेश केला आहे त्यात रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि तमिळनाडूतील जिंजी या  किल्ल्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, 'हिंदवी स्वराज्याचे प्रणेते, रयतेचे रक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांनी केवळ भूभागावर राज्य केले नाही, तर लोकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले. त्यांनी उभारलेले किल्ले हे स्वराज्यनिर्मिती, रणनीती, स्थापत्य व स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. किल्ल्यांचे शत्रूस गूढ वाटणारे प्रवेशद्वार, संरक्षणाची रणनीती व स्थापत्यशास्त्रीय उत्कृष्टता ही जगात कुठेही सापडणार नाही, अशी मराठ्यांची अमूल्य देणगी आहे. हेच खरे.'

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की,'हिंदवी स्वराज्याचे अद्वितीय वैश्विक मूल्य आहे.या ऐतिहासिक क्षणासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो. विशेषतः मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मन:पूर्वक अभिनंदन व आभार. मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग व संस्कृती मंत्रालयाने सक्रिय पाठिंबा दिला तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारच्या अथक प्रयत्नांतून हे शक्य झाले.' 

'छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी वारशाला ही जागतिक ओळख लाभणे हे आपल्या संस्कृतीचे आणि अस्मितेचे सर्वश्रेष्ठ सन्मानचिन्ह आहे., असे नमूद करून 'जय शिवराय ' या घोषणेने सावंत यांनी प्रतिक्रियेची सांगता केली आहे.

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज