शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
4
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
5
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
6
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
8
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
9
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
10
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
11
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
12
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
13
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
14
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
15
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
16
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
17
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
18
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
19
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
20
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोयत्याचा धाक दाखवून बाणावलीत जबरी चोरी

By admin | Updated: May 14, 2014 07:16 IST

मडगाव : सासष्टीत चोर्‍यांचा उच्छाद वाढला असून बाणावली व मडगाव येथे शस्त्राचा धाक दाखवून चोर्‍या करण्याच्या घटना घडल्या.

मडगाव : सासष्टीत चोर्‍यांचा उच्छाद वाढला असून बाणावली व मडगाव येथे शस्त्राचा धाक दाखवून चोर्‍या करण्याच्या घटना घडल्या. विशेष म्हणजे या दोन्ही चोर्‍या दिवसा झाल्याने राज्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. बाणावली येथील मोती डोंगरावरील सेंट बाप्तीस्त चर्चला लागून असलेल्या कार्यालयात मंगळवारी भरदिवसा चोरी झाली. बुरखा घालून आलेल्या एका दांपत्याने या कार्यालयात असलेल्या दोन युवतींना कोयत्याचा धाक दाखवून त्यांना प्रसाधनगृहात बंद करून दहा हजार रुपये रोख, एक लॅपटॉप व दोन मोबाईल चोरून नेले. भरदिवसा झालेल्या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे निवृत्त अभियंते जनार्धनन यांच्या घरी मडगावात मंगळवारी सायंकाळी ६ वाजता चोरी झाली. त्यांच्या पत्नी देवी जनार्धनन (५४) या घरी एकट्याच असताना एक व्यक्ती त्यांच्या घरी आली. त्याने चाकूचा धाक दाखवून सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली. या वेळी देवी यांनी प्रतिकार केल्याने चोरट्याने त्यांच्यावर हल्ला केल्याने त्यांच्या हाताला जखम झाली. त्यांच्या हातात असलेल्या सोन्याच्या बांगड्या, तसेच देवघरातील सोन्याची नाणी असा सुमारे दोन लाखांचा ऐवज घेऊन तो चोरटा पसार झाला. मिळालेल्या माहितीप्रमाणे, एका दिवसापूर्वी हा चोरटा जनार्धनन यांच्या घरी आला होता. त्याने त्यांच्या पत्नीला ‘दादा कुठे गेले,’ असा प्रश्न विचारला होता. कदाचित हा चोरटा आपल्या पतीबद्दल विचारत असावा, असे समजून त्यांनी ते पोस्टात गेले आहेत, असे सांगितले. मंगळवारी सकाळी ६ पासून हा चोरटा जनार्धनन यांच्या घरावर पाळत ठेवून होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. मडगाव पोलिसांनी श्वानपथकाच्या साहाय्याने चोरट्याचा माग घेण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यश आले नाही. बाणावलीत ज्या ठिकाणी चोरी झाली तेथे श्वानपथक आणण्यास पोलिसांना तब्बल पाच तास लागले. दुपारी बारा वाजता चोरी झाली होती. मात्र, श्वानपथक सायंकाळी साडेपाच वाजता घटनास्थळी पोहोचले. पोलिसांच्या या हलगर्जीपणामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला. (प्रतिनिधी) (पान २ वर)