शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

खाणप्रश्नी केंद्र काही करणार नाही; पर्रीकरांची मंत्र्यांना माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 23:13 IST

खाणप्रश्नी केंद्राकडून तोडग्याची अपेक्षा संपुष्टात आली असे अन्य मंत्र्यांकडून मानले जात आहे.

पणजी : राज्यातील खनिज खाणी नव्याने सुरू करण्याबाबत केंद्र सरकारकडून काहीच माहिती आलेली नाही, केंद्र सरकार काही करतेय असे कळालेले नाही, त्यामुळे गोवा सरकारलाच खाण व्यवसाय सुरू करण्याविषयी काय तो तोडगा काढावा लागेल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्री विजय सरदेसाई यांना सांगितले. यावरून खाणप्रश्नी केंद्राकडून तोडग्याची अपेक्षा संपुष्टात आली असे अन्य मंत्र्यांकडून मानले जात आहे.

मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर कृषी मंत्री सरदेसाई यांनी पर्रीकर यांना खनिज खाणींच्या विषयाबाबत विचारले. खनिज खाणी सुरू करण्याविषयी लोक आम्हाला प्रश्न करतात, आम्ही त्यांना काय म्हणून उत्तर द्यावे अशी विचारणा सरदेसाई यांनी केली. यावेळी मंत्री जयेश साळगावकर व अन्य एक-दोन मंत्री उपस्थित होते. बाकीचे मंत्री बैठक संपल्यामुळे माघारी गेले होते.

पर्रीकर यांनी स्पष्टच सांगितले की- केंद्र सरकारने गोव्याच्या खाणप्रश्नात हस्तक्षेप केलेला नाही. केंद्राकडून काही माहिती आलेली नाही व त्यामुळे आम्हालाच म्हणजे राज्य सरकारलाच आता काय ते करावे लागेल, असे  मंत्री सरदेसाई यांनी पत्रकारांना सांगितले. लोकसभा निवडणूक होण्यापूर्वी की नंतर गोवा सरकार कृती करील असे आपण मुख्यमंत्र्यांना विचारले तेव्हा पर्रीकर यांनी निवडणुकीपूर्वीच कृती केली जाईल अशी ग्वाही आपल्याला दिल्याचे मंत्री सरदेसाई यांनी नमूद केले.

283 क्रीडा कर्मचाऱ्यांना दिलासा दरम्यान, क्रिडा खात्यातील 190 व गोवा क्रिडा प्राधिकरणातील (सॅग) 93 असे मिळून एकूण 283 कर्मचा:यांना सोमवारी सरकारने मोठा दिलासा दिल्याचे क्रिडा मंत्री बाबू आजगावकर यांनी जाहीर केले. या कर्मचा:यांना सेवेत कायम केले जावे अशी मागणी आपण करत आलो. मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली व या 283 कर्मचा:यांना तात्पुरता स्टेटस देऊन त्यांना सरकारी वेतनश्रेणीनुसार वेतन द्यावे असा आदेश संबंधित अधिका:यांना दिलासा. दि. 1 जानेवारी 2019 पासून सरकारी वेतनश्रेणीनुसार त्यांना वेतन मिळेल. तसेच त्यांची तंदुरुस्ती पाहून व भरती नियम पाहून त्यांना टप्प्याटप्प्याने सेवेत कायम केले जाईल. आम्ही सॅगच्या मंडळासमोर हा प्रस्ताव मांडू, असे मंत्री आजगावकर म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी सर्वात मोठी मागणी मान्य केली आहे. मी त्यामुळे खूष झालो. यापूर्वी केवळ सात हजार रुपयांच्या वेतनावर अनेक कर्मचारी निवृत्त झाले आहेत. आता मागणी मान्य झाल्याने कर्मचा:यांनी जास्त कष्ट घेऊन काम करावे, असे आवाहन आजगावकर यांनी केले.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा