शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात पर्यटकांच्या सोयीसुविधांसाठी केंद्र सरकारकडून 10 कोटी रुपये मंजूर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 12:33 IST

गोव्यात येऊन किनार्‍यांवर फिरणाऱ्या पर्यटकांना अनेकदा शौचालयांअभावी गैरसोयीला सामोरे जावे लागते. कपडे बदलण्याच्या खोल्याही नसल्याने पर्यटकांची धांदल उडते. पर्यटकांची गैरसोय होऊ नये, म्हणून त्यांच्या मूलभूत सोयीसुविधांसाठी केंद्र सरकारने 10 कोटी रुपये मंजूर केले आहेत.

पणजी : गोव्यात येऊन किनार्‍यांवर फिरणाऱ्या पर्यटकांना अनेकदा शौचालयांअभावी गैरसोयीला सामोरे जावे लागते. कपडे बदलण्याच्या खोल्याही नसल्याने पर्यटकांची धांदल उडते. यावर उपाय म्हणून आता जागतिक दर्जाच्या काही मूलभूत सुविधा किनार्‍यांवर उभ्या केल्या जाणार आहेत. केंद्र सरकारने त्यासाठी गोव्याला 10 कोटी रुपये मंजूर केले आहेत.

उत्तर गोव्यातील वागातोर, अंजुणा, हरमल, मोरजी, सिकेरी, कळंगुट, कांदोली, बागा अशा किनार्‍यावर शुक्रवार ते रविवापर्यंत एक लाख पर्यटक असतात. या पर्यटकांना अत्यंत दर्जेदार अशी प्रसाधनगृहे गोवा पर्यटन विकास महामंडळाकडून बांधून दिली जाणार आहेत. किनारपट्टीतील आमदार मायकल लोबो यांनी 'लोकमत'ला सांगितले की, स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र सरकारने एकूण 10 कोटी रुपये मंजूर केले आहेत. 

या निधीतून बागा, कलंगुट, कांदोली, सिकेरी अशा भागात पाच शौचालये बांधली जातील. बागा येथे एका शौचालयाचे काम सुरूही झाले आहे. एका शौचालयांच्या कामावर एकूण दीड कोटी रुपये खर्च केले जातील. लोबो यानी सांगितले की, जागतिक दर्जाची ही शौचालये बॅक्टेरियल प्लान्ट्सनी युक्त असतील. बागा येथे अशा एका शौचालयाचे काम सुरू झाले आहे. 

पर्यटकांसाठी वाहने पार्क करण्याच्या जागा आता विकसित केल्या जात आहेत. किनार्‍यांवरील काही जागा पर्यटकांना अधिक आकर्षित करण्यासाठी त्या जागांचे सौंदर्यीकरण केले जात आहे. यासाठीही पर्यटन विकास महामंडळाने निधी उपलब्ध केला आहे.विशेष म्हणजे किनारपट्टीत आता मोठी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. नवा पर्यटन मोसम सुरू झाल्याने किनारपट्टी स्वच्छ केली जात आहे. रोज 10 ट्रक भरलेला कचरा गोळा करून तो कलंगुट पठारावर असलेल्या प्रक्रिया प्रकल्पाच्या ताब्यात दिला जात आहे.