शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राने गोव्याला पॅकेज द्यावे, मुख्यमंत्र्यांची बैठकीत मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 20:03 IST

मुख्यमंत्र्यांसोबत मुख्य सचिव परिमल रे हे देखील उपस्थित होते.

पणजी : खनिज खाणप्रश्नी गोवा सरकारने खाण अवलंबितांसाठी योजना राबविण्यासाठी सुमारे तीनशे कोटी रुपयांचा खर्च केला आहे. केंद्र सरकाने याचा विचार करून थोडी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. धारगळ ते मोपा अशा महामार्गाच्या कामासाठीही केंद्राने निधी द्यावा, असाही मुद्दा मुख्यमंत्र्यांनी मांडला.

शुक्रवारी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी बैठक घेतली. अर्थसंकल्पपूर्व सल्लामसलत असे या बैठकीचे स्वरुप होते. देशातील अनेक अर्थमंत्री या बैठकीत सहभागी झाले. गोवा हे पर्यटन राज्य असून वार्षिक सुमारे साठ ते सत्तर लाख पर्यटक या राज्याला भेट देतात. आम्हाला पर्यटन अंतर्गत व ग्रामीण भागात नेता यावे म्हणून केंद्र सरकारने मदत करावी असाही मुद्दा मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत मांडला. खनिज खाण बंदीमुळे गोव्याला महसुल प्राप्तीबाबत मोठा फटका बसला आहे. आम्हाला पॅकेजच द्या असे मी म्हणत नाही पण थोडी नुकसान भरपाई मिळावी असा प्रस्ताव आपण मांडल्याचे मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर लोकमतला सांगितले. 

धारगळहून मोपा विमानतळाला जोडणारा एक 6.5 किलोमीटर लांबीचा जलदगती महामार्ग बांधला जाणार आहे. भू-संपादन आणि महामार्ग बांधणी यावर गोवा सरकार खर्च करील. एनएच 66 नावाचा हा महामार्ग बांधण्यासाठी 60 कोटींचा खर्च येईल. भू-संपादनासाठीच जास्त पैसा जाईल. केंद्राने त्यासाठी मदत करावी अशीही विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. उच्च प्रतीच्या खनिजाच्या निर्यातीवरील डय़ुटी रद्द करावी अशी मागणी अलिकडे राज्यातील खनिज व्यवसायिक करत आहेत. तीही मागणी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय अर्थ मंत्र्यांसमोर मांडली. गोव्यात गेलच्या वायूवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. स्वयंपाकासाठी वायू या वाहिन्यांमधून गेल पुरविणार आहे. त्यासाठी जो मूल्यवर्धीत कर (व्हॅट) गोळा केला जाईल, त्यातील वाटा गोव्याला दिला जावा असाही मुद्दा सावंत यांनी मांडला.10 कोटी भरणो अशक्य 

मुख्यमंत्र्यांसोबत मुख्य सचिव परिमल रे हे देखील उपस्थित होते. केंद्रीय क्रिडा मंत्री किरण रिजूजी यांचीही मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. राष्ट्रीय क्रिडा स्पर्धाचे आयोजन करण्यास विलंब झाल्याने गोव्याला यापूर्वी 10 कोटींचा दंड भारतीय ऑलंपिक असोसिएशनकडून घातला गेला आहे. तो दंड गोव्याला भरता येणार नाही, आम्ही यशस्वीपणो क्रिडा स्पर्धा आयोजित करू, असे मुख्यमंत्र्यांनी रिजूजी यांना सांगितले. क्रिडा स्पर्धा आयोजित करण्यास विलंब का झाला याची कारणमिमांसाही मुख्यमंत्र्यांनी केली व तो दंड माफ केला जावा, अशी विनंती केली.

टॅग्स :goaगोवा