शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

पणजीत महापौर, नगरसेवकांची ‘गांधीगिरी’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 13:07 IST

प्लास्टिकबंदी लागू : ग्राहकांच्या हाती दिल्या कागदी पिशव्या

पणजी : गोव्याच्या या राजधानी शहरात महापालिकेने मंगळवारपासून प्लास्टिकबंदी लागू केली आहे. महापौर, उपमहापौर, मनपा आयुक्त तसेच नगरसेवकांनी सकाळी बाजारपेठेत फिरुन दुकानदार तसेच फळे, भाजी विक्रेते आणि ग्राहकांमध्ये जागृती केली. बाजारात प्लास्टिक पिशव्या घेऊन येणाऱ्या ग्राहकांच्या हातात कापडी तसेच कागदी पिशव्या देऊन ‘गांधीगिरी’ केली. उद्यापासून कडक अंमलबजावणी होणार असून कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या वापरताना दिसल्यास 5 हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाणार आहे. 

महापालिका आयुक्त अजित रॉय यांनी पाच निरीक्षकांचे विशेष पथक स्थापन केले असून कारवाईसाठी पोलिसांचीही मदत घेतली जाईल. 50 मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीच्या प्लास्टिक पिशव्याही वापरता येणार नाहीत. केवळ कागदी अथवा कापडी पिशव्या वापराव्या लागतील. दुकानदारांबरोबरच ग्राहकांनाही कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक कप वापरल्यास दंड ठोठावला जाईल. गांधी जयंतीचे औचित्य साधून आज २ ऑक्टोबरपासून शहरात प्लास्टिकबंदी पूर्णपणे अंमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला. मध्यंतरी काही नगरसेवकांनी ही बंदी शिथिल केली जावी, अशी मागणी केली परंतु आयुक्त अजित रॉय ठाम राहिले. त्यामुळे नगरसेवकांनाही आपापल्या प्रभागांमध्ये फिरुन लोकांमध्ये जागृती करावी लागली. 

महापौर विठ्ठल चोपडेकर यांच्या म्हणण्यानुसार प्लास्टिक कचऱ्याचा फार मोठा उपद्रव महापालिकेला झालेला आहे. प्लास्टिक पिशव्या, बाटल्या तसेच अन्य प्लास्टिक साहित्यामुळे पावसाळ्यात गटारे तुंबतात आणि पाणी रस्त्यावर येऊन पूरस्थिती निर्माण होते. पर्यावरणाला प्लास्टिक कचरा हानिकारक आहे. त्यामुळे मनपाने हे कडक पाऊल उचलले आहे. दरम्यान, शहरातील पदपथांवरील अतिक्रमणे हटविण्याचे काम त्वरित सुरु होणार आहे. त्यासाठीही महापालिका निरीक्षकांबरोबरच दोन पोलिस हेड कॉन्स्टेबल्स तसेच एक पोलिस शिपाई यांचा समावेश असलेले पथक स्थापन करण्यात आले आहे.  

टॅग्स :goaगोवाPlastic banप्लॅस्टिक बंदी