शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

जातीनिहाय गणना काळाची गरज: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; दिल्ली भेटीत विकसित गोव्याच्या योजना मांडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 07:13 IST

मुख्यमंत्री डॉ. सावंत रविवारी दुपारी दिल्ली येथील एनडीए बैठक आटोपून थेट मये महोत्सवासाठी उपस्थित राहिले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: देशात जातीनिहाय जनगणना करणे काळाची गरज होती. त्यामुळे सामाजिक, आर्थिक स्तर स्पष्ट होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले पाऊल इतिहासात कायम राहील. दिल्ली भेटीत विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांचे विशेष अभिनंदन केले, तसेच तिन्ही सैन्य दलातील सैनिकांनी केलेल्या कामगिरीबद्दलही अभिनंदन करण्यात आल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मये येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मुख्यमंत्री डॉ. सावंत रविवारी दुपारी दिल्ली येथील एनडीए बैठक आटोपून थेट मये महोत्सवासाठी उपस्थित राहिले होते. त्यावेळेस स्थानिक पत्रकारांशी बोलताना दिल्ली भेट अत्यंत शुभदायी झाल्याचे सांगताना प्रत्येक मुख्यमंत्र्यांना सात मिनिटे बोलण्याचा अवधी मिळाला त्यावेळी आपण राज्याच्या योजना, तसेच नियोजित योजना व गोव्याला काय अपेक्षित आहे, यासंदर्भात मत मांडल्याचे सांगितले.

गोवा खाजन शेतीबाबत केंद्राचे सहकार्य, अपेक्षा असून, त्याबद्दलचा मुद्दाही आपण अधोरेखित केल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, विकसित गोवा २०२७ नियोजन करण्याबाबतही आपली भूमिका स्पष्ट केल्याचे सांगितले. जातीनिहाय जनगणनेला चालना दिल्याबद्दल गोमंतकीय जनतेच्या वतीने आपण पंतप्रधान मोदी यांचे विशेष अभिनंदन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्याला काय नवीन अपेक्षित आहे, तसेच वेगवेगळ्या क्षेत्रांत कोणत्या संधी घेणे शक्य आहे, अशा विविध पैलूंवर अभ्यासपूर्ण निरीक्षणे करून काही मुद्दे मांडण्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले.

डबल इंजिन सरकारमुळे विकासाला गती

बैठकीत वेगवेगळ्या नेत्यांचे मार्गदर्शनही लाभले. त्यातून नव्या योजनांना चालना मिळते, असे मुख्यमंत्री म्हणाले. पंतप्रधान मोदी यांचे सतत मार्गदर्शन लाभल्याने जलदगतीने राज्याच्या विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने आमचे सरकार डबल इंजिनच्या सहकार्याने अधिक गतिमानरीतीने विकासाला चालना देण्यास कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले. त्याबरोबरच राज्याचा विकास साधण्यासाठी आणखी काय करता येईल, याबाबतही चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण