शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील कसिनो बेकायदा - काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 23:55 IST

गोव्यात बेकायदेशीररित्या कसिनो चालविले जात आहेत.

पणजी : गोव्यात बेकायदेशीररित्या कसिनो चालविले जात आहेत. राज्य सरकारने केलेल्या कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी नाही तसेच केंद्रीय कायदा आयोगाने संसदेत सादर केलेल्या अहवालाचाही भंग झालेला आहे, असा आरोप प्रदेश काँग्रेसने केलेला आहे. कायद्यानुसार कसिनो चालत नसल्याने ताबडतोब ते बंद करावेत अशी मागणीही करण्यात आली आहे.पत्रकार परिषदेत पक्षाचे प्रदेश प्रवक्ते गिरीश चोडणकर म्हणाले की, जुगार आणि क्रीडा सट्टा : कायदेशीर चौकट या विषयावरकेंद्रीय कायदा आयोगाचा २७६ वा अहवाल १ ऑगस्ट २0१८ रोजी संसदेत सादर करण्यात आला. या अहवालात ज्या तरतुदी आहेत त्या पाहता त्याचे गोव्यात उल्लंघन झालेले आहे. व्यवहारांशी आधार कार्ड लिंक असायला हवे तसेच अन्य बाबी आहेत त्याचे पालन होत नाही. कसिनोंमुळे राज्याचा वर्षाकाठी ५ हजार कोटींचा महसूल बुडत आहे.राज्यातील भाजप आघाडी सरकार भ्रष्टाचारी आहे, असा आरोप करताना चोडणकर यांनी साधन सुविधा विकास महामंडळातील भ्रष्टाचाराचे आगर बनले आहे व सिध्दार्थ कुंकळ्येंकर हे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे एजंट आहेत, असाही आरोप त्यांनी केला. मांडवी नदीवरील तिसऱ्या पुलावर विजेचे दिवे बसविण्याचे ४५ कोटींचे कंत्राट निविदा न काढताच देण्यात आले. प्रत्येक वीज खांबामागे साडेतीन लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. या पुलापेक्षा प्राधान्यक्रमे हाती घेण्यासारख्या अन्य गोष्टीही होत्या. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. पुलाच्या बाबतीत भ्रष्टाचाराच्या आरोपांना सरकारने उत्तरही दिलेले नाही.सभापतींच्या राजीनाम्याची मागणीसभापती प्रमोद सावंत हे मंत्र्यांसारखे वागतात. सरकारविरुध्द आरोप केल्यास त्या आरोपांना मंत्री असल्याप्रमाणे उत्तरे देताना त्यानी खरे तर नि:पक्षपाती असायला हवे परंतु ते पक्षपाती वागत असल्याचा आरोप करुन त्यांनी त्वरित सभापतीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी चोडणकर यांनी केली. खाणी पूर्ववत सुरू करण्यासाठी या सरकारने काहीच केले नाही. वर्षभरात केवळ प्रधानमंत्री मोदी यांची एक अपॉइंटमेंट घेऊ शकले एवढेच काम या सरकारने केलेले आहे, अशी टीका चोडणकर यांनी केली.