शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेवेळी मगोप उमेदवार उभा करणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2017 02:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : राज्यसभा खासदार पदासाठीच्या निवडणुकीत तसेच पणजी आणि वाळपई विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भारतीय

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : राज्यसभा खासदार पदासाठीच्या निवडणुकीत तसेच पणजी आणि वाळपई विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अपशकुन करायचा नाही, असे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने ठरवले आहे; मात्र २०१९ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचा उमेदवार दोन्ही मतदारसंघांत उभा केला जाईल, असे सांगत भाजपने आपल्याला गृहीत धरू नये, असा इशारा पक्षाने दिला आहे.पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक झाल्यानंतर त्या बैठकीत घेतलेल्या ठरावांची माहिती अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी शनिवारी दिली. राज्यसभा निवडणुकीवेळी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, असा ठराव या बैठकीत मांडून संमत करण्यात आला. पणजी व वाळपई विधानसभा मतदारसंघातून मगोप पोटनिवडणूक लढवणार नाही; कारण आम्हाला सरकारचे स्थैर्य महत्त्वाचे आहे, असे ढवळीकर यांनी नमूद केले. मात्र, २०१९ साली लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही आमचे उमेदवार उभे करू; कारण आम्हाला मतांचे प्रमाण वाढवायचे आहे, असे ते म्हणाले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीवेळी मगोपला साडेअकरा टक्के मते मिळाली. लोकसभा निवडणुकीवेळी हे प्रमाण आम्हाला २0 टक्क्यांपर्यंत न्यायचे असून त्यासाठी आम्ही आतापासूनच तयारी सुरू करण्याचा ठराव घेतला आहे, असे ढवळीकर यांनी सांगितले.जर यापुढे कोणत्याही पक्षाच्या विद्यमान आमदाराने राजीनामा दिला व त्या मतदारसंघात पोटनिवडणूक होऊ घातली, तर त्या जागेवर मात्र मगो पक्ष दावा करील, असेही ढवळीकर म्हणाले. गोमांस खाणाऱ्याला जाहीरपणे फाशी द्यायला हवी, अशी मागणी साध्वी सरस्वती यांनी केल्याबाबत काय वाटते, असे पत्रकारांनी विचारले असता, साध्वी सरस्वती यांनी जे काही विधान केले, त्याच्याशी राजकीय पक्षांचा संबंध येत नाही, असे ढवळीकर म्हणाले. साध्वी सरस्वती ज्या संघटनेचे प्रतिनिधित्व करतात, त्या संघटनेच्या विचारांचा त्या प्रसार करत असाव्यात. आम्हाला त्यांच्या विधानांशी देणेघेणे नाही. राजकीय पक्ष हे राज्यघटनेनुसार चालत असतात, असेही ढवळीकर म्हणाले.