शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

कूळ कायद्यातील ‘सनसेट’ कलम रद्द

By admin | Updated: May 7, 2015 00:38 IST

पणजी : पर्रीकर सरकारच्या काळात करण्यात आलेल्या कूळ कायद्यातील दुरुस्त्या हा वादाचा व मोठ्या चर्चेचा विषय बनलेला असतानाच

पणजी : पर्रीकर सरकारच्या काळात करण्यात आलेल्या कूळ कायद्यातील दुरुस्त्या हा वादाचा व मोठ्या चर्चेचा विषय बनलेला असतानाच विद्यमान मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आता अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कूळ कायद्यातील ‘सनसेट’ कलम रद्द केले जाईल, असे पार्सेकर यांनी बुधवारी येथे ‘लोकमत’ला सांगितले.कूळ कायद्यात दुरुस्त्या करून पर्रीकर सरकारने मामलेदारांकडील खटले काढून ते न्यायालयांकडे सोपविले. तसेच कुळांनी जमिनीवर मालकी सिद्ध करण्यासाठी दावे करण्याच्या हेतूने तीन वर्षांत अर्ज करावेत, असे सनसेट कलमही सरकारने दुरुस्त्यांद्वारे कूळ कायद्यात समाविष्ट केले. त्यामुळेच प्रचंड वाद निर्माण झाला. सनसेट कलमामुळे तीन वर्षांनंतर कुळांना अर्जच करता येणार नाही व त्यामुळे त्यांच्या जमिनींवर गदा येईल, अशा प्रकारची तक्रार करायला समाजाच्या विविध घटकांना वाव मिळाला.मुख्यमंत्री पार्सेकर यांनी या सर्व गोष्टींवर विचार करून सनसेट कलम रद्द करण्याचे ठरविले आहे. कूळ कायद्यातील सगळ्याच दुरुस्त्या मागे घेण्याची गरज नाही. कुळांचे खटले मामलेदारांकडून काढून न्यायालयांकडे सोपविण्याचा निर्णय योग्यच होता व आहे, असे मुख्यमंत्री पार्सेकर म्हणाले. त्यामुळे ती दुरुस्ती आपण मागे घेत नाही. मामलेदारांकडे पंधरा-वीस वर्षे कुळांचे खटले चालतात. भाटकारांनाही व कुळांनाही जमिनीचा लाभ मिळत नाही. अशा वादग्रस्त जमिनी मग काही राजकारणी व दलाल विकत घेतात. कूळ कायद्यातील दुरुस्त्यांना विरोध करणाऱ्या काही राजकारण्यांनी कुळांच्याच वादग्रस्त जमिनी विकत घेतल्या आहेत. मामलेदारांकडे दाव्यांची नोंदणी करण्यासाठी जे शुल्क होते ते कमी होते. मात्र, आता न्यायालयानेही कुळांचे दावे नोंदणीसाठी शुल्क कमी केले आहे, असेमुख्यमंत्री म्हणाले. (खास प्रतिनिधी)