शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचे कळंगुट पंचायतीचे संस्थेला आदेश

By काशिराम म्हांबरे | Updated: June 19, 2023 21:31 IST

पुतळा हटवण्यासाठी १० दिवसांची कारणे दाखवा नोटीस पंचायतीकडून समितीला देण्यात आली आहे

म्हापसा - पंचायतीकडून कसल्याच प्रकारची परवानगी न घेता जून महिन्याच्या आरंभी कळंगुट येथे उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हटवण्यात यावा असे आदेश कळंगुट पंचायत शिवस्वराज्य कळंगुट या संस्थेला दिले आहेत.

शनिवार ३ जून रोजी रातोरात हा पुतळा कळंगुट येथील पोलीस स्थानकाला लागून असलेल्या शेजारील खुल्या जागेत रस्त्यावर शिवप्रेमींकडून या पुतळ्याची उभारणी करण्यात आलेली. ४ जून रोजी पहाटेपर्यंत पूतळ्याची उभारणी पूर्ण केली होती. पुतळ्याच्या उभारणीनंतर मंगळवारी ६ जून रोजी महाराजांचा शिवराज्यभिषेकचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला होता.

पुतळा हटवण्यासाठी १० दिवसांची कारणे दाखवा नोटीस पंचायतीकडून समितीला देण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीत पुतळा हटवण्यात आला नसल्यास पंचायतीकडून तो हटवण्यात येईल असा इशारा पंचायतीकडून या नोटीसद्वारे दिला आहे. पंचायतीचे सरपंच जोझफ सिक्वेरा यांच्याकडे या संबंधी विचारणा केली असता संस्थेला कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आल्याचे त्यांनी मान्य केले. पंचायतीकडून कोणत्याच प्रकारची परवानगी न घेता पूतळा उभारण्यात आला असल्याने ही नोटीस बजावण्यात आल्याचे ते म्हणाले.

पंचायतीची परवानगी न घेता आज एका संस्थेकडून पूतळा उभारण्यात आला.  उद्या दुसरी संस्था अशा प्रकारचे कृत्य करेल. पंचायत असे बेकायदेशीर प्रकार सहन करणार नाही. आपणही शिवाजी महाराजांचा आदर करतो पण बेकायदेशीर कृत्यास नाही असे सिक्वेरा यांनी माहिती देऊन सांगितले.