शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोवा मंत्रिमंडळाची बैठक येत्या 31 ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या घरी होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 20:24 IST

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अचानक आपल्या करंजाळे-दोनापावल येथील निवासस्थानी येत्या 31 रोजी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. तत्पूर्वी 30 रोजी मुख्यमंत्री आपल्या निवासस्थानीच राज्य गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची (आयपीबी) बैठक घेणार आहेत.

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अचानक आपल्या करंजाळे-दोनापावल येथील निवासस्थानी येत्या 31 रोजी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. तत्पूर्वी 30 रोजी मुख्यमंत्री आपल्या निवासस्थानीच राज्य गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची (आयपीबी) बैठक घेणार आहेत.

मुख्यमंत्री गेले बरेच महिने मंत्रिमंडळाची बैठक घेऊ शकले नव्हते. फक्त सरक्युलेशन पद्धतीने अवघे काही प्रस्ताव मंत्र्यांकडून संमत केले गेले होते. मुख्यमंत्री गेल्या 14 रोजी दिल्लीतील एम्स इस्पितळातून गोव्यात आले. त्यानंतरही ते मंत्रिमंडळाची बैठक घेऊ शकले नव्हते. काँग्रेसचे प्रवक्ते जितेंद्र देशप्रभू यांनी शुक्रवारी सरकारवर जोरदार हल्ला चढविला व मुख्यमंत्री प्रतिसाद देत असल्याचा पुरावा म्हणून व्हिडिओ द्या, अशी मागणी केली होती. भाजपाने अधिकृतरित्या देशप्रभू यांना शनिवारी उत्तर दिले नाही. आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी हळदोणे येथे पत्रकारांशी बोलताना स्वत:च्यापरीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण पर्रीकर यांना स्वादुपिंडाचा कॅन्सर आहे व त्यांनी विश्रंती घेऊ द्या, असे विधान त्यांनी केले.

पर्रीकर यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली असल्याचा संदेश फोनवरून शनिवारी सायंकाळी सर्व मंत्र्यांना दिला गेला. येत्या बुधवारी सायंकाळी पाच वाजता बैठक होईल. मंत्रिमंडळासमोर नेमके कोणते विषय मंजुरीसाठी येतील याची अजून अन्य मंत्र्यांना कल्पना नाही. साधारणत: चार-पाच महिन्यांच्या खंडानंतर आता मंत्रिमंडळाची बैठक होईल.

दरम्यान, राज्य गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची (आयपीबी) यापूर्वी झालेली बैठक वादग्रस्त ठरलेली आहे. आयपीबीच्या बैठका मुख्यमंत्र्यांच्याच अध्यक्षतेखाली व्हाव्या लागतात. यापूर्वी झालेली बैठक पर्रीकर यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतली, असा दावा आयपीबीच्या काही सदस्यांनी केला. त्यावर विरोधकांकडून टीका झाली. तथापि, त्या बैठकीत फक्त आठच प्रस्ताव चर्चेस येऊन त्यावर निर्णय झाले होते. आता 30 रोजी आयपीबीच्या बैठकीत उर्वरित प्रस्तावांबाबत निर्णय होणार आहेत.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा