शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

'सेझ कंपन्यांना व्याज देताना मंत्रिमंडळाकडून कायदा बायपास'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 22:52 IST

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्याकडून मुद्दा उपस्थित

पणजी : सेझ कंपन्यांकडून सरकारने जमिन परत घेताना त्यांना तब्बल 123.29 कोटी रुपयांचे व्याज दिले. गोवा औद्योगिक विकास महामंडळाच्या कायद्यात व्याज देण्याची तरतूद नाही पण मंत्रिमंडळाने तो कायदा बायपास करून निर्णय घेतला व व्याज दिले असा मुद्दा विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी शुक्रवारी विधानसभेत मांडला. प्रश्नोत्तराच्या तासावेळी कामत यांनी याबाबतचा प्रश्न मांडला होता. सेझ रद्द झाल्यानंतर विषय सर्वोच्च न्यायालयात पोहोचला होता. अलिकडे सरकारने पाच सेझ कंपन्यांकडून भूखंड परत घेताना त्यांना भूखंडाची मूळ रक्कम म्हणून 132.91 कोटी रुपये परत केलेच, शिवाय 123.29 कोटींचे व्याजही परत केले. कामत यांनी हेच सूत्र पकडून प्रश्न विचारला. आयडीसीच्या कायद्यात व्याज परत करण्याची तरतूद आहे काय व यापूर्वी आयडीसीच्या इतिहासात कधी कुणा उद्योजकाचा भूखंड परत ताब्यात घेताना त्याला व्याजही परत केल्याचे उदाहरण आहे काय अशी विचारणा कामत यांनी केली.उद्योग मंत्री विश्वजित राणे यांनी यावर उत्तर दिले. औद्योगिक विकास महामंडळाच्या इतिहासात यापूर्वी कधी कुणा उद्योजकाला व्याज परत केले गेले नव्हते. मात्र सेझ कंपन्यांबाबतचा विषय हा अपवादात्मक आहे. तो अनेक वर्षे चर्चेत आहे व त्यातील गुंतागुंत लक्षात घेऊन सरकारने लाखो चौरस मीटर जमीन परत मिळवण्यासाठी प्राधान्य दिले. गोव्याला जमीन परत मिळविण्यात यश आले ही आनंदाची गोष्ट आहे. व्याज देण्याचा निर्णय हा महामंडळाने घेतला नाही तर मंत्रिमंडळाने घेतला होता व मंत्रिमंडळ निर्णयाची अंमलबजावणी केली गेली, असे मंत्री राणे म्हणाले. कायद्यात तरतूद नसताना मंत्रिमंडळ निर्णय घेऊ शकत नाही असा मुद्दा कामत यांनी मांडला. मंत्रिमंडळाने कायद्याला बायपास केले. व्याज द्यायचेच होते तर कायदा दुरुस्तीसाठी विषय विधानसभेकडे यायला हवा होता, असे कामत यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेस