शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

पुढील पर्यटन हंगामाबाबत गोव्यातील व्यावसायिक आशावादी पण किनाऱ्यांवरील ८0 टक्के शॅकवाल्यांनी धंदा गुंडाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2018 12:48 IST

गोव्यात पावसाळ्यानंतर येणारा पुढील पर्यटन हंगाम व्यवसायाच्यादृष्टिने चांगला जाईल, अशी आशा या क्षेत्रातील व्यावसायिक बाळगून आहेत.

पणजी : गोव्यात पावसाळ्यानंतर येणारा पुढील पर्यटन हंगाम व्यवसायाच्यादृष्टिने चांगला जाईल, अशी आशा या क्षेत्रातील व्यावसायिक बाळगून आहेत. दुसरीकडे किनाऱ्यांवरील ८0 टक्के शॅकवाल्यांनी आपला व्यवसाय गुंडाळला आहे. जीएसटी तसेच अन्य कारणांमुळे मंदीमुळे यंदा पर्यटकांचे प्रमाण तुलनेत कमी असल्याचा दावा व्यावसायिकांकडून केला जात आहे. तर पर्यटन खात्याचे म्हणणे असे आहे की, देशी आणि विदेशी दोन्ही पर्यटकांची संख्या वाढलेली आहे. 

अखिल गोवा शॅकमालक संघटनेचे अध्यक्ष क्रुझ कार्दोझ म्हणाले की, दक्षिण गोव्यात केळशी किनाऱ्यावर १७ पैकी केवळ एकच शॅक कार्यरत आहे. कळंगुट, कांदोळी, बागा किनाऱ्यांवर ६0 टक्के शॅक काढण्यात आले. नोटाबंदीचा परिणाम अजून जाणवत आहे. अन्न पदार्थ तसेच इतर वस्तूंवर जीएसटी लागू केल्याने पर्यटक दुरावले आहेत. दुसरी बाब म्हणजे पर्यटन क्षेत्रात पायाभूत सुविधांमध्ये वाढ होण्याची गरज आहे. पर्यटनाच्या बाबतीत श्रीलंका, थायलँड, मलेशिया या राष्ट्रांपेक्षा भारत मागे आहे. तेथे स्वस्ताईमुळेही पर्यटक आकर्षित होत आहेत. पर्यटन संचालक मिनीन डिसोझा म्हणाले की, पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या वर्षीच्या हंगामात साधारणपणे ८0 लाख पर्यटकांनी गोव्याला भेट दिली होती. यंदा हे प्रमाण आणखी वाढलेले आहे. दुसरीकडे खाजगी जमिनींमधील शॅकना यापुढे पावसाळ्यात शॅक काढावे लागणार नाहीत. त्यासाठी सीआरझेड कायद्यात दुरुस्ती आणली जात आहे. १८ जूनपर्यंत सरकारने हरकती व सूचना मागविल्या आहेत. खाजगी जमिनीत असलेली शॅक बांधकामे न हटविता ती केवळ प्लास्टिकची आश्चादने करुन झाकून ठेवल्याचेही चित्र काही किनाºयांवर दिसत आहे.   अद्याप नुकसान भरपाई नाहीदरम्यान, काही दिवसांपूर्वी ओखी वादळात किनाऱ्यांवरील शॅकमध्ये समुद्राचे पाणी घुसून झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप शॅकमालकांना मिळालेली नाही, असे कार्दोझ यांनी सांगितले. ते म्हणाले की, ‘मोरजी, मांद्रे, हरमल, केळशी, बाणावली भागात किनाऱ्यांवर शॅकमध्ये पाणी घुसून मोठी हानी झाली होती. एका अंदाजानुसार ७५ लाख रुपयांहून अधिक हानी झाली असून सरकारने यावर काहीच हालचाली केलेल्या नाहीत. या विषयाचा आता पाठपुरावा करणार आहोत.’         पुढील पर्यटन हंगामाबाबत आशावादी दरम्यान, पावसाळ्यानंतर येणारा पुढील पर्यटन हंगाम चांगला जाईल, याबाबत खास करुन चार्टर टूर ऑपरेटर्स आशावादी आहेत. ट्रॅव्हल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे अर्नेस्ट डायस म्हणाले की, ‘दाबोळी विमानतळावरील धावपट्टीच्या वापराबाबत नौदलाकडून निर्बंध कायम राहतील, असे वाटले होते. परंतु गेल्याच आठवड्यात नौदल अधिकारी आणि विमानतळ प्राधिकरण अधिकारी यांच्यासोबत झालेली बैठक फलदायी ठरल्याने चार्टर विमानांसमोर असलेला अडसर दूर झालेला आहे.’