शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
2
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
3
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
4
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
5
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
6
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
7
मित्रांसोबत इकडं जा... तिकडं जा खेळ रंगला अन् सराव कमी पडला! पृथ्वी शॉला चूक कळली, आता...
8
धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
9
Viral Video: धापा टाकत रुग्णालयात पोहोचला, डॉक्टरांनी विचारताच उघडली बॅग, पाहून अनेकांची बोलती बंद!
10
"कॉम्प्रोमाइज कर तुला रोल देतो", टीव्ही अभिनेत्याला दिग्दर्शकाने दिलेली ऑफर, केला धक्कादायक खुलासा
11
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
12
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
13
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
14
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
15
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
17
"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले
18
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी
19
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
20
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?

व्यावसायिक शिक्षण महागले!

By admin | Updated: October 13, 2015 02:54 IST

पणजी : अभियांत्रिकी, फार्मसी तसेच व्यवस्थापन शिक्षण दहा ते पंधरा टक्क्यांनी महागले असून २0१५-१६ शैक्षणिक वर्षापासून पुढील चार वर्षांकरिता

पणजी : अभियांत्रिकी, फार्मसी तसेच व्यवस्थापन शिक्षण दहा ते पंधरा टक्क्यांनी महागले असून २0१५-१६ शैक्षणिक वर्षापासून पुढील चार वर्षांकरिता नवे शुल्क अधिसूचित करण्यात आले आहे. निवृत्त न्यायमूर्ती ए. पी. लवंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या शिफारशीनुसार खासगी, विनाअनुदानित व्यावसायिक संस्थांसाठी नवी फी लागू झाली आहे. तांत्रिकी शिक्षण उपसंचालक प्रदीप कुस्नूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी वरील समितीच्या शिफारशीनुसार शुल्क फेररचना केली जाते. शैक्षणिक क्षेत्रातही पायाभूत खर्च वाढत असतो. तो विचारात घेऊन शुल्क फेररचना केली जाते. चालू शैक्षणिक वर्षात ज्यांनी प्रवेश घेतला आहे, त्यांची अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत म्हणजेच चार वर्षांच्या कालावधीसाठी फी निश्चित झाली आहे. दरवर्षी साधारणपणे पंधरा टक्क्यांपर्यंत शुल्कवाढ होते, असेही त्यांनी सांगितले. वेर्णा येथील पाद्रे कोसेसांव अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षासाठी प्रति सेमिस्टर ट्युशन फी ४५ हजार रुपये, दुसऱ्या वर्षासाठी ४९ हजार रुपये, तृतीय वर्षासाठी ५३ हजार रुपये व चौथ्या वर्षासाठी ५७ हजार रुपये निश्चित झाली आहे. प्रत्येक वर्षाला प्रति सेमिस्टर ५ हजार रुपये विकास शुल्क व १ हजार ४५0 रुपये संस्था शुल्क आकारले जाईल. (पान २ वर)