शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात सिग्नल तोडणारे आपोआप टिपले जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 18:58 IST

वाहतूक सिग्नलचे उल्लंघन करणारी वाहने आपोआप टिपली जाणारी स्वयंचलित यंत्रणा बसविण्याचा प्रकल्प गोवा पोलिसांच्या विचाराधीन आहे.

पणजी: वाहतूक सिग्नलचे उल्लंघन करणारी वाहने आपोआप टिपली जाणारी स्वयंचलित यंत्रणा बसविण्याचा प्रकल्प गोवा पोलिसांच्या विचाराधीन आहे. त्यासाठी प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. वाहतूक सिग्नलच्या संकेताची उल्लंघने टिपण्यासाठी सिग्नलच्या ठिकाणी पोलीस ठेवावे लागणार नाही. उल्लंघने टिपणारी म्हणजे लाल दिवा लागला असताही न थांबणारे कॅमऱ्यातच टिपले जातील, अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी पोलीस खाते प्रयत्नशील आहे. त्यासाठी प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी म्हटले आहे.राज्यात अनेक ठिकाणी स्वयंचलित सिग्नलची व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्यत: महामार्गावर अनेक ठिकाणी ती कार्यरत करण्यात आली आहे. सिग्नलचे संकेत पाळले जात आहेत, उल्लंघनाचे प्रकारही किरकोळपणे घडत आहेत. परंतु काही ठिकाणी विशेषत: पर्वरी ओ कोकेरो सारख्या ठिकाणी अनेक लोक संकेत पाळत नसल्याच्या तक्रारी पोलीस महासंचालकांना आल्या आहेत. त्यामुळे स्वयंचलित सिग्नलबरोबरच उल्लंघने टिपणारी स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित करण्याचा पोलीस खात्याचा प्रयत्न आहे. दरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-याविरुद्ध सुरू केलेली मोहीम चालूच ठेवली जाणार असल्याचे महासंचालकांनी म्हटले आहे.