काणकोण : किंदळे पणसुले शाळा समूहातर्फे कात्यायनी बाणेश्वर विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक प्रमोद देसाई व मास्तीमळ शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मीकांत शिरोडकर यांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला काणकोणचे नगराध्यक्ष महादेव देसाई, साहित्यीक कमलाकर म्हाळशी पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्याहस्ते शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. पाटणे येथील सरकारी शाळेच्या सभागृहात झालेल्या या सोहळ्यात शिक्षक राजू देवस्थळी, सुदेश नाईक, सुधा पै, महेंद्र फळदेसाई, संतोष सतरकर यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गौरीश वेर्णेकर यांनी केले तर समूहाची सचिव अरुणा शेट यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
किंदळे पणसुले शाळा समूहातर्फे दोघां शिक्षकांचा सत्कार
By admin | Updated: May 3, 2014 14:23 IST