शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पर्रीकरांच्या दोन्ही मुलांनी भाजपाचे काम करावे, पक्षाची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 19:19 IST

स्वर्गीय मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या दोन्ही मुलांनी भारतीय जनता पक्षाचे काम करावे, अशी विनंती भाजपने दोन्ही मुलांना केली आहे.

पणजी : स्वर्गीय मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या दोन्ही मुलांनी भारतीय जनता पक्षाचे काम करावे, अशी विनंती भाजपने दोन्ही मुलांना केली आहे. उत्पल व अभिजात हे पर्रीकर यांचे दोन विवाहित मुलगे आहेत. पर्रीकर यांचे निधन झाल्यानंतर झालेल्या पहिल्या भेटीत राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश खन्ना यांनी तुम्ही पर्रीकर यांच्याप्रमाणेच भाजपाचे काम करावे, अशी विनंती त्यांना केली. ही माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.पर्रीकर यांचा मुलगा पणजी मतदारसंघातून विधानसभेची पोटनिवडणूक लढवणार आहे काय, असे पत्रकारांनी विचारताच, तेंडुलकर म्हणाले की तसा कोणताच विषय झालेला नाही. माझ्यापर्यंत तरी तशी चर्चा आलेली नाही. फक्त पक्षाचे काम करावे एवढीच विनंती केली गेली. वडिलांनी जसे भाजपाचे काम केले, तसेच मुलांनीही ते सुरू ठेवावे, अशी विनंती खन्ना यांनी केली. ती विनंती मान्य करावी की फेटाळावी हे ठरविण्यासारखी स्थिती नव्हती. कारण दोन्ही मुलांना निधनाचे दु:ख होते व त्यामुळे जास्त चर्चा झाली नाही.दरम्यान, पर्रीकर यांच्या अस्थींचे चाळीस कलश भाजपाकडून तयार करण्यात आले आहेत. हे कलश सोमवारी भाजपच्या गट अध्यक्षांच्या हाती देण्यात आले. चाळीसही विधानसभा मतदारसंघांमध्ये आज मंगळवारी एकाच दिवशी हे कलश फिरविले जातील. त्यानंतर रात्र होण्यापूर्वी मंगळवारीच गावांतील नद्यांमध्ये अस्थींचे विसर्जित करण्यात येईल. कलश प्रदान करण्याचा कार्यक्रम सोमवारी सायंकाळी भाजपाच्या मुख्यालयासमोर झाला. त्यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विनय तेंडुलकर, मंत्री विश्वजित राणे आदी उपस्थित होते. पर्रीकर यांना शासकीय पातळीवरून श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम कला अकादमीत होणार आहे. पर्रीकर यांच्या जीवनावर एक पुस्तकही सरकार प्रकाशित करणार आहे. लोकांनी त्यासाठी लेखन करावे, असे आवाहन सावंत यांनी केले.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकgoaगोवा