शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

अनैतिक संबंधातूनच खून

By admin | Updated: February 4, 2015 02:36 IST

वास्को/पणजी : क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या आणि मानवी नात्यांना काळिमा फासणाऱ्या वास्कोतील सासू-सुनेच्या दुहेरी

वास्को/पणजी : क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या आणि मानवी नात्यांना काळिमा फासणाऱ्या वास्कोतील सासू-सुनेच्या दुहेरी खुनाची कबुली धाकटी सून प्रतिमा नाईक हिने मंगळवारी रात्री पोलिसांसमोर दिली. प्रतिमाला पोलिसांनी अटक केली असून तिची आई आणि प्रियकराचाही या कारस्थानात सहभाग असल्याचे उघड झाले आहे. आपल्या अनैतिक संबंधांचा भांडाफोड होईल, या भीतीपोटीच प्रतिमाने दोघींचा काटा काढल्याच्या निष्कर्षाप्रत तपास पथक आले आहे. गोव्याला हादरवून सोडणाऱ्या या खूनप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या ३०२ कलमांतर्गत खुनाच्या आरोपाखाली आणि १२० (बी) अंतर्गत कारस्थान रचण्याच्या गुन्ह्याखाली प्रतिमाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात तिच्या प्रियकराला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. तसेच काटे-बायणा येथे राहाणाऱ्या तिच्या आईचीही भूमिका संशयास्पद असल्यामुळे तिलाही अटक होण्याची शक्यता आहे. तसे संकेत देत पोलिसांनी गुन्हा नोंदविताना एकापेक्षा अधिक व्यक्तींनी हे कारस्थान रचल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिमा ही डॉक्टर असलेल्या जाऊ नेहा हिच्याशी लहान सहान कारणांवरून भांडण उकरून काढायची. नेहाला ६ महिन्यांची मुलगी होती, तर प्रतिमाला मूल नव्हते. शिवाय तिला ‘हिपॅटायटिस बी’चा आजार होता. त्यामुळे तिचा द्वेषाग्नी भडकला होता व त्याचे परिमार्जन खुनात झाले. दरम्यान, अधिक चौकशीसाठी प्रतिमाला १४ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करून घेण्यात आली आहे, तर मृत नेहाच्या मुलीला तिच्या वास्कोत राहणाऱ्या मावशीकडे सोपविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)