शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

दाबोळीत बांधकामांना एनओसीकरिता नौदलाकडून अडवणूक, राजनाथ सिंहांना तोडग्यासाठी साकडे!

By किशोर कुबल | Updated: October 30, 2023 18:20 IST

या प्रश्नावर लवकरच दिल्लीत विशेष बैठक बोलावून तोडगा काढण्याचे आश्वासन सिंह यांनी दिले.

पणजी : दाबोळीत बांधकामांसाठी नौदलाकडून ना हरकत दाखल्यांना अडचणी येतात याकडे स्थानिक आमदार तथा पंचायतमंत्री मॉविन गुदिन्हो यांनी काल गोवा भेटीवर आलेले केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे लक्ष वेधले. या प्रश्नावर लवकरच दिल्लीत विशेष बैठक बोलावून तोडगा काढण्याचे आश्वासन सिंह यांनी दिले.

गोवा सागरी परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी सिंह हे गोव्यात आले होते. दाबोळी विमानतळावर शिष्टाचारमंत्री या नात्याने त्यांचे स्वागत केल्यानंतर मॉवीन यांना त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांनी हा विषय त्यांच्याकडे मांडला. दाबोळी विमानतळ नौदलाच्या ताब्यात असल्याने आजुबाजुच्या लोकांना लहानसहान बांधकामांसाठीही नौदलाकडून ना हरकत दाखला मिळवावा लागतो व ते अडचणीचे ठरते. बांधकामे यामुळे अडतात, अशा स्थानिकांच्या वाढत्या तक्रारी आहेत. विधानसभा अधिवेशनातही हा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावर मॉविन यांनी केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली होती.

दाबोळी हा नागरी विमानतळ असला तरी नौदलाच्या ताब्यात आहे त्यामुळे तेथे नागरी विमानांसाठीही वेळेचे निर्बंध आहेत. मोपा येथे मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ झाल्याने तूर्त प्रवाशांना थोडा दिलासा मिळालेला आहे. बांधकामांसाठी नौदलाच्या एनओसीचा प्रश्न सोडवला जाईल, असे आश्वासन  सिंह यांनी मॉविन यांना दिले. मॉविन म्हणाले की, विमानतळाच्या आजुबाजुला राहणाय्रांना बांधकामांसाठी नौदलाची  एनओसी अनिवार्य केल्यामुळे लोकांना खूप त्रास आणि समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.’

टॅग्स :goaगोवा