शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

भाजपकडून ओबीसीचा फक्त निवडणूकांसाठी वापर, इंडिया आघाडीच्या ओबीसी नेत्यांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2024 15:18 IST

गिरीश चोडणकर म्हणाले, पर्रीकरानंतर खासदार श्रीपाद नाईक यांना मुख्यमंत्री करणे गरजेचे होते, पण भाजपने पार्सेकर तसेच आता डॉ. प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्री केले.

 - नारायण गावस

पणजी : केंद्रीय राज्य मंत्री तसेच सध्या भाजपचे उत्तर गोव्याचे उमेदवार श्रीपाद नाईक यांना भाजप पक्षामध्ये काहीच स्थान नाही ते ज्येष्ठ नेते म्हणून त्यांना ठेवले आहे. भाजप ओबीसीचा फक्त निवडणूकांसाठी वापरत असून हा एक प्रकारे बहुजन समाजावर अन्याय आहे, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गिरीश चोडणकर यांनी रविवारी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांच्या सोबत, आपचे समन्वय ॲड. अमित पालेकर, सुनिल कवठणकर, अमरनाथ पणजीकर, धर्मा चोडणकार, चंद्रकांत चोडणकर तसेच अन्य बहुजन समाजाचे नेते उपस्थित होते. 

गिरीश चोडणकर म्हणाले, पर्रीकरानंतर खासदार श्रीपाद नाईक यांना मुख्यमंत्री करणे गरजेचे होते, पण भाजपने पार्सेकर तसेच आता डॉ. प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्री केले. श्रीपाद नाईक हे आपल्या मुलालाही उमेदवारी तिकीट देऊ शकले नाही. भाजप फक्त ओबीसी बहुजन समाजाचा निवडणूकीसाठी वापर करत आहे. त्यांना बहुजन समाज पुढे गेलेला नको आहे. भाजप आणि आरएएसएस मिळून बहुजनांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे लोकांनी आता विचार करुन मतदान करावे. ॲड. रमाकांत खलप हे खरे बहुजन समजाचे हितचिंतक आहे. त्यांनी अनेक बहुजन समाजाचा लोकांना राजकारणात आणले आहे. बहुजन समाजाचे लोकांना यंदा ॲड. रमाकांत खलप यांना मोठ्या प्रमाणात मतदान करुन विजयी करावे.

ॲड. अमित पालेकर म्हणाले, श्रीपाद नाईक हे राज्यातील ओबीसी समाजाचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहे. एवढी वर्षे निवडून येऊन त्यांनी बहुजनांसाठी काहीच केले नाही. फक्त गटार बांधणे सभागृह करणे यासारखी कामे केली जात आहे. ही कामे एक सरपंच आमदारही करुन शकतो ही कामे खासदारांची नाही. भाजपने ओबीसी बहुजनांचा फक़्त वापर केला आता पुन्हा श्रीपाद नाईकच्या नावाने ओबीसी बहुजनांची मते मागितली जात आहे.  त्यामुळे लोकांना आता जागृत  होण्याची गरज आहे. या भ्रष्ट भाजप सरकारला आता पुन्हा सत्तेत आणू नये. कॉँग्रेस महाआगडीच्या दोन्ही उमेदवारांना यावेळी  लोकांनी निवडून द्यावे असे ते म्हणाले. 

टॅग्स :goa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४goaगोवा