शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

सासष्टीत भाजपचे पानिपत, काँग्रेसची बाजी

By admin | Updated: March 12, 2017 02:26 IST

सुशांत कुंकळयेकर ल्ल मडगाव बलाढ्य सासष्टीने या वेळी खंबीरपणे काँग्रेसला साथ देताना भाजपचे सत्तेवर येण्याचे मनसुबे उधळून लावले. त्याचबरोबर गोवा फॉरवर्ड

सुशांत कुंकळयेकर ल्ल मडगावबलाढ्य सासष्टीने या वेळी खंबीरपणे काँग्रेसला साथ देताना भाजपचे सत्तेवर येण्याचे मनसुबे उधळून लावले. त्याचबरोबर गोवा फॉरवर्ड व राष्ट्रवादीशी युती केली असती तर ही महायुती गोव्यात सत्ता काबीज करण्याएवढी सक्षम झाली असती, हेही सिद्ध केले. सासष्टीतून या वेळी लुईझिन फालेरो, चर्चिल आलेमाव व फिलीप नेरी रॉड्रिग्स या तिघांनी पुनरागमन केले तर काँग्रेसची उमेदवारी नाकारल्यावरही पुन्हा सत्तेवर येण्याची स्वप्ने पाहणारे ज्योकीम आलेमाव केवळ ३३ मतांनी पराभूत झाले. दिगंबर कामत सातव्यांदा आमदार म्हणून जिंकून आले तर बाहुबली मिकी पाशेको यांना काँग्रेसचे विल्फ्रेड डिसा यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. या तालुक्यातील आठपैकी सहा मतदारसंघांत काँग्रेसचा विजय झाला.भाजपने या वेळी मडगाव व फातोर्डा या दोन्ही मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले होते. भाजप कार्यकर्ते हे दोन्ही मतदारसंघ आपण जिंकल्यातच जमा असे सांगत सुटले होते. मात्र, दिगंबर कामत यांनी सातव्यांदा मडगावातून विधानसभेची निवडणूक लढविताना भाजपचे शर्मद रायतूरकर यांच्यावर ४,१७६ मतांनी विजय मिळविला. तर जवळच्या फातोर्डा मतदारसंघात विजय सरदेसाई यांनी भाजपचे दामू नाईक यांच्यावर १,३३४ मतांनी विजय मिळविला. सरदेसाई यांना १0,५१६ तर दामू नाईक यांना ९१८२ मते मिळाली.बाणावलीत ‘आप’च्या रॉयोला फर्नांडिस यांनी चांगली कामगिरी केली असली तरी त्यांना चर्चिल आलेमाव यांची घोडदौड रोखता आली नाही. आलेमाव यांच्याकडून त्यांना ५,१९१ मतांनी पराभव स्वीकारावा लागला. चर्चिल आलेमाव यांना ९३७३ तर रॉयोला यांना ४१८२ मते मिळाली. आमदार कायतू सिल्वा यांना ३९९५ तर काँग्रेसचे एडविन बार्रेटो यांना २१५७ मते मिळाली.नावेलीत लुईझिन फालेरो यांनी अपक्ष आवेर्तान फुर्तादो यांच्यावर २४५७ मतांनी विजय मिळवून पुन्हा एकदा विधानसभेत पाऊल टाकले. तर कुंकळ्ळीत झालेल्या अटीतटीच्या लढतीत अपक्ष ज्योकीम आलेमाव यांना काँग्रेसचे क्लाफासियो डायस यांच्याकडून केवळ ३३ मतांनी पराभूत व्हावे लागले. मागच्या निवडणुकीत पराभूत झालेले फिलीप नेरी रॉड्रिग्स यांनी अपक्ष बेंजामिन सिल्वा यांच्यावर तब्बल ५२५३ मतांनी विजय मिळवून मागच्या निवडणुकीत बेंजामिनने मिळविलेला विजय फ्ल्यूक होता, हे सिद्ध केले.