शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

'सावर्डे, काणकोण, फोंडा, शिरोडा, मडकई व सांगेत मोठे मताधिक्क्य भाजपला मिळेल'

By किशोर कुबल | Updated: May 8, 2024 14:02 IST

मुख्यमंत्र्यांचा दावा : पल्लवी ६० हजारांहून अधिक तर श्रीपाद १ लाखाहून अधिक मताधिक्क्याने विजयी होतील

किशोर कुबल/पणजी

पणजी : उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक यांना सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये मताधिक्क्य मिळेल व ते एक लाखापेक्षा अधिक मतांनी निवडून येतील तसेच दक्षिणेत केवळ ६ मतदारांसंघात थोडेसे मागे असलो तरी सावर्डे, काणकोण, फोंडा, शिरोडा, मडकई व सांगे या मतदारसंघांमध्ये मोठे मताधिक्क्य भाजपला मिळेल. पल्लवी धेंपे ६० हजारांहून अधिक मताधिक्क्य मिळवून विजयी होतील, असा दावा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला.पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले कि,‘ संपूर्ण गोव्यात कॉग्रेसचे अस्तित्त्व आता केवळ चार विधानसभा मतदारसंघांपुरतेच सिमीत राहिलेले आहे. कॉग्रेसने यावेळी प्रचारात केवळ जाती, धर्माचे राजकारण केले. भाजप नेहमीच विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढतो. त्यांच्याकडे सांगण्यासारखा एकही मुद्दा नव्हता. गोव्यासाठी त्यांनी काहीच केले नाही. त्यामुळे त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नव्हते.

मुख्यमंत्री म्हणाले की,‘ काल मतदान केंद्रांबाहेर कॉग्रेसच्या टेबलांवर माणसेच नव्हती. त्यांची दयनीय स्थिती होती. आमच्या उमेदवारांचा केवळ अपप्रचार त्यांनी केला. मुख्यमंत्री म्हणून माझ्यावर आरोप केले. गोव्यातील जनतेने त्यांना साथ न देता भाजपला मतदान केले. भाजप आमदार, मंत्री कार्यकर्ते यांनी निस्वार्थ भावनेने काम केले. मोदींच्या सभेनंतर वेगळे वातवारण येथे निर्माण झाले.

श्रीपाद नाईक यांनी मतदारांचे आभार मानले. ते म्हणाले कि,‘ आमदार, मंत्री, पंच, सरपंच  यांनी स्वत:ची निवडणूक असल्याप्रमाणेच काम केले.