शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
5
Operation Sindoor Live Updates: आम्हाला दहशतवाद संपवायचाय, तुम्ही धाडस करा, कपिल सिब्बल यांचा मोदींवर निशाणा
6
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
7
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
8
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
10
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
11
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
12
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
13
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
14
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
15
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
16
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
17
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
18
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
19
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
20
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?

भाजप व्होट बँक अबाधित

By admin | Updated: February 17, 2015 02:26 IST

पणजी : भारतीय जनता पक्षाची पणजी मतदारसंघातील व्होट बँक अबाधित राहिली आहे, हीच गोष्ट सोमवारी झालेल्या

पणजी : भारतीय जनता पक्षाची पणजी मतदारसंघातील व्होट बँक अबाधित राहिली आहे, हीच गोष्ट सोमवारी झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झाली. मतदारसंघातील तीसपैकी केवळ तीनच केंद्रांवर काँग्रेसचे उमेदवार सुरेंद्र फुर्तादो यांना थोडी आघाडी मिळाली. उर्वरित सर्व केंद्रांवर भाजपचे विजयी उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनाच आघाडी मिळाली आहे. २०१२ साली काँग्रेसतर्फे यतिन पारेख यांनी पणजीतून निवडणूक लढवली होती, तेव्हा काँग्रेसला ४ हजार ९९५ मते मिळाली होती. त्या वेळी सतरा हजार एवढे मतदान झाले होते. या वेळी १५ हजार ७७४ मतदान झाले. काँग्रेसला त्यापैकी ४ हजार ४२१ मते मिळाली. म्हणजे तीन वर्षांनंतरही काँग्रेसची मते वाढली नाहीत. २०१४च्या लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसला पणजीत साडेचार हजार मते प्राप्त झाली होती. रवी नाईक यांनी त्या वेळी पणजीत जास्त प्रचार न करता साडेचार हजार मते प्राप्त केली होती. भाजपला २०१२ मध्ये ११ हजार मते मिळाली होती. भाजपला आता ९ हजार ९८९ मते मिळाली. म्हणजे दहा हजारांपर्यंत भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी मजल मारली. अपक्ष समीर केळेकर व सदानंद वायंगणकर या दोघांना मिळून जी आठशे मते मिळाली आहेत व नोटा पर्याय ज्या ३३० मतदारांनी स्वीकारला आहे, त्यात भाजप समर्थकांचीही मते आहेत. पणजी मतदारसंघातील हिंदू बहुजन समाज हा ठामपणे कुंकळ्येकर यांच्याच बाजूने राहिला हे बोक द व्हाक, सांतइनेज, मळा, रायबंदर येथे भाजपने मिळविलेल्या प्रचंड मतांवरून स्पष्ट होते. महिलावर्गानेही भाजपलाच जास्त मते दिली. कुंकळ्येकर यांना तिकीट दिले गेले तरी, पणजीतील भाजपची व्होट बँक फुटली नाही. भाजपची हक्काची मते पक्षाला मिळालीच. ख्रिस्ती समाजाचीही मते (पान २ वर)